पोलीस भरतीसाठी बनावट नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या दोघांवर गुन्हा
पोलीस दलातील शिपाईचालक पदाच्या भरतीसाठी नॉन क्रिमिलेयरचे बनावट प्रमाणपत्र सादर सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे .स्वरूप संतोष गुरव कसबा तारळे ता राधानगरी आणि विशाल विष्णू कांबळे वय 28 कसबा तारळे अशी त्यांची नावे असून विशाल कांबळे याला अटक करून 12 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संतोष मारुती पानकर (वय 45 विहार , हनुमान ,कसबा बावडा ) यांनी शिवपुरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.गुरव हा सन 2022 23 च्या पोलीस शिपाई चालक पदाच्या भरतीत सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाला आहे.समांतर आरक्षणासाठी त्यांने नॉन क्रिमिलियर चे प्रमाणपत्र सादर केले आहे.कागदपत्रांच्या पडताळणीत ही बाब समोर आली.तर कांबळे यांने दुस्रयाची आयडी वापरून त्यामध्ये फेरफार करूनत्यावर शासनाची खोटी व बनावट मोहर उमटवून कागदपत्रे खरे असल्याचे भासवून फसवणूक केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस गुरू याचा शोध घेत आहेत.