For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हमाल पंचायत पतपेढीच्या निवडणुकीनंतर २५ जणांवर गुन्हा; जमावबंदीचा आदेशाचा भंग

02:08 PM Jun 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
हमाल पंचायत पतपेढीच्या निवडणुकीनंतर २५ जणांवर गुन्हा  जमावबंदीचा आदेशाचा भंग
Advertisement

संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी

सांगली शहरातील मार्केट यार्ड येथील हमाल पंचायत सहकारी पतपेढीच्या निवडणूक निकालानंतर जमाव बंदी आदेशाचा भंग करीत विनापरवाना रॅली काढून घोषणाबाजी केल्याप्रकरणी या पतपेढीच्या नूतन संचालकांसह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयनगर पोलीस ठाण्याकडील पोलीस कर्मचाऱ्यांने हा गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

हा गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये संचालक बाळू रामचंद्र बंडगर (रा. स्टेट बँक कॉलनी, अभयनगर), तुकाराम बापू हाक्के (निरंकार कॉलनी, अभयनगर), सुरेश प्रकाश कचरे (रा. आनंदनगर, भारत सुतगिरणीजवळ, कुपवाड), रामचंद्र विलास चोरमुले (रा. ढालेवाडी, ता. कवठेमहांकाळ), राजू मनोहर गायकवाड (रा. जुनी धामणी रोड, हनुमाननगर), सदाशिव उत्तम खांडेकर (रा. बाज, ता. जत), देवदास सायमन बंदेला (रा. केसरखान मळ्यासमोर, मालगाव रोड, मिरज), महादेव बापू ऊपनर (अष्टविनायकनगर, सांगली), सागर वामन लेंगरे (रा. रामजानकी मंदिराजवळ, संजयनगर), अजित धोंडीराम कुट (रा. बजरंगनगर, कुपवाड), संजय शिवाजी टोणे (रा. हमालवाडी, कुपवाड), पंकज भीगोंडा पाटील (रा. बामनोळी रोड, कुपवाड), पोपट बाबूराव काळेल (रा. सावळी) व इतर 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सात निवडून आलेल्या संचालकांचा समावेश आहे.

हमाल पतपेढीची निवडणूक रा†ववारी झाली. सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत बापूसाहेब मगदूम सहकारी पॅनेलने सर्वच जागा जिंकत बाजी मारली. निकालानंतर विद्यमान संचालकांसह कार्यकर्त्यांनी संजयनगर परिसरात मोटारसायकल रॅली काढत घोषणाबाजी केली. जिल्हाधिकार्यांनी जिह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. या आदेशाचा भंग करून विनापरवाना रॅली काढल्याने संचालकासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.