महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चंदा कोचर यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा! टोमॅटो पेस्ट कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप

07:00 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टोमॅटो मॅजिक’च्या तक्रारीची कसून चौकशी सुरू

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर या पुन्हा एकदा कायदेशीर वादात अडकल्या आहेत. कोचर यांच्यासह इतर नऊ जणांवर टोमॅटो पेस्ट कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप करून त्यांच्याविऊद्ध राष्ट्रीय राजधानीत नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर 9 जणांमुळे 27 कोटी ऊपयांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप केला जात आहे. 2009 चे हे प्रकरण अलीकडेच प्रकाशझोतात आले असून 9 डिसेंबर रोजी पटियाला हाऊस न्यायालयाने दिल्ली पोलिसांना तपास सुरू करण्याचे आदेश दिले.

न्यायालयीन आदेशानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 20 डिसेंबर रोजी फसवणूक आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपांचा हवाला देऊन एफआयआर नोंदवला आहे. पी अँड आर ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेडचे (टोमॅटो मॅजिक) संचालक शम्मी अहलुवालिया यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार आरोपींनी असली दस्तऐवज म्हणून परदेशी बँकेकडून ‘लेटर ऑफ व्रेडिट’ (एलओसी) पास करण्याचा कट रचल्याचा दावा केला आहे. त्यानुसार एफआयआरमध्ये चंदा कोचर, संदीप बक्षी (सीईओ आणि एमडी आयसीआयसीआय बँक), विजय झगडे (आयसीआयसीआय बँक माजी व्यवस्थापक), मुंबईतील आयसीआयसीआय बँकेच्या ग्लोबल टेड सर्व्हिसेस युनिटचे अनामित अधिकारी (आता पंजाब नॅशनल बँकेचे प्रतिनिधी) यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच अतुल कुमार गोयल (एमडी आणि सीईओ पंजाब नॅशनल बँक), के.के. बोर्डिया (माजी जीएम ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स), अखिला सिन्हा (एजीएम पीएनबी आणि ओबीसीचे तत्कालीन शाखा प्रमुख), मनोज सक्सेना (एजीएम पीएनबी आणि ओबीसीचे तत्कालीन शाखा प्रमुख), आणि के. के. भाटिया (ओबीसीमधील माजी मुख्य व्यवस्थापक) यांच्या नावाचाही समावेश आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article