Solapur : विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटूंचा स्टार एअरने प्रवास
स्टार एअरचा मान, विशेष चार्टर विमानाने मुंबई ते दिल्ली केला हवाई प्रवास
सोलापूर : संजय घोडावत समूहाच्या विमानवाहतूक शाखा स्टार एअरला मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेती भारतीय महिला क्रिकेट संघ मुंबईहून दिल्लीपर्यंत विशेष चार्टर फ्लाइट ए ५-८३२८ ने नेण्याचा मान स्टार एअरला मिळाला. विशेष म्हणजे स्टार एअर कंपनीकडूनच सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.
ही उड्डाण सेवा स्टार एअरच्या विश्वचषक मोहिमेतील अंतिम आणि ३४ वी उड्डाण ठरली. या मोहिमेदरम्यान एअरलाईनने जगभरातील विविध संघांसाठी दोन डझनहून अधिक चार्टर उड्डाणांचे संचालन केले. हे स्टार विश्वासार्ह एअरच्या ऑपरेशन्स,व्यावसायिकता आणि उत्कृष्ट आतिथ्यसेवेचे द्योतक ठरले.
स्टार एअरने आयसीसी आणि सर्व संघांचे आभार मानले आहेत, ज्यांनी या जागतिक स्पर्धेत सेवा देण्याची संधी दिली. कंपनीने भारतभर सुरक्षित, कार्यक्षम आणि आरामदायक प्रादेशिक हवाई संपर्क पुरवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.
हा क्षण ब्रँड, प्रतिष्ठा अन् विश्वासार्हतेचा पुरावा
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विजयी प्रवासाचा भाग होणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या मेहनतीतून आणि यशातून भारताच्या भावना प्रतिबिंबित होतात. आयसीसीने स्टार एअरवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. हा क्षण आमच्या वाढत्या ब्रेड, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हतेचा पुरावा आहे. - कॅप्टन सिमरन सिंग तिवाना, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टार एअर