कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

क्रिकेटपटू रिंकू सिंगचा वाङनिश्चय सोहळा संपन्न

06:22 AM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

भारतीय संघाचा क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज यांचा वाङनिश्चय (साखरपुडा) सोहळा रविवारी हॉटेल सेंट्रम येथे पार पडला. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत रिंकू सिंगने प्रिया सरोजच्या बोटात अंगठी घातली. हा क्षण दोघांसाठीही खूप भावनिक ठरला. यादरम्यान खासदार प्रिया सरोज यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. या सोहळ्यापूर्वी रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांनी हॉटेलमध्ये प्री-एंगेजमेंट शूटदेखील केले. पांढऱ्या शेरवानीमध्ये रिंकू आणि हलक्या गुलाबी लेहेंग्यात प्रिया सरोज एकमेकांचे हात धरून स्टेजवर पोहोचल्यानंतर विधीनुसार अंगठी घालण्याचा विधी पूर्ण केला.

Advertisement

प्रियाने रिंकूला घालण्यासाठी कोलकाताहून एक डिझायनर अंगठी आणली होती, तर रिंकूने प्रियासाठी मुंबईहून एक खास अंगठी मागवली होती. दोन्ही अंगठ्यांची किंमत अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. अलीगडच्या एका निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन रिंकूने क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. खासदार प्रिया सरोज कॉन्व्हेंट शिक्षित आणि राजकीय कुटुंबातील आहेत. दोघांची पहिली भेट 2023 मध्ये झाली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article