कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जपान आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे स्थान कायम

06:15 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

2028 मध्ये होणाऱ्या आइची नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे स्थान कायम ठेवण्यात आले असल्याचे आशिया ऑलिम्पिक कौन्सिलने (ओसीए) सांगितले. जपानमध्ये ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्याची ही एकंदर चौथी वेळ आहे.

Advertisement

ओसीए व स्पर्धा संयोजन समितीच्या या आठवड्यात झालेल्या बैठकीत आशियाई स्पर्धेत क्रिकेट या क्रीडा प्रकाराचे स्थान कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 28 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत क्रिकेट व मिश्र मार्शल आर्ट्स या दोन्ही क्रीडा प्रकारांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला गेला, असे ओसीएने सांगितले.

या स्पर्धेत क्रिकेट हा टी-20 प्रकारात खेळविला जाईल आणि त्याचे आयोजन आइची प्रीफेक्चर येथे होतील. मात्र त्यांचे निश्चित ठिकाण अद्याप ठरविण्यात आलेले नाही. दक्षिण आशिया विभागात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असल्याने त्याबद्दल खूप उत्सुकता दिसून येते. याशिवाय टी-20 क्रिकेटला 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेतही सामील करण्यात आलेले असल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे, असे ओसीएने म्हटले आहे. 1900 मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यात ग्रेट ब्रिटनने फान्सचा 158 धावांनी पराभव करून जेतेपद मिळविले होते. या स्पर्धेत फक्त दोनच संघ उतरले होते. त्यानंतर प्रथमच लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

या स्पर्धेसाठी नागोया पोर्टवर तरंगते निवासस्थान बनविले जाणार असून सर्व खेळाडूंची त्यात निवासाची व्यवस्था असेल. मात्र क्रिकेटपटू, बॅडमिंटनपटू व फुटबॉलपटू यांच्या निवासाची सोय हॉटेल्समध्ये करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article