महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात क्रिकेटचा तडका

05:03 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलियात यांच्यात क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. अशातच या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानच्या चुरू येथील स्वत:च्या भाषणात क्रिकेटचा तडका लावला आहे. काँग्रेसला राजस्थानातून ऑल आउट करायचे आहे असे मोदींनी म्हटले आहे. सद्यकाळात पूर्ण देश क्रिकेटमय झाला आहे.  क्रिकेट सामन्यावेळी फलंदाज स्वत:च्या संघासाठी धावा काढतो, तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये धावा काढणे राहिले दूरच ते परस्परांना धावचीत (रनआउट) करू पाहत आहेत. काँग्रेस सरकारची 5 वर्षे परस्परांना धावचीत करण्यातच खर्ची पडली. उर्वरित वेळेत महिलांसंबंधी आणि अन्य प्रकरणांमध्ये वक्तव्ये करून ते हिटविकेट झाले असे मोदींनी म्हटले आहे.

Advertisement

क्रेकेट सामन्यातील किस्स्यांचा उल्लेख करत मोदींनी काँग्रेसवर राजकीय हल्ला चढविला आहे. जलजीवन मिशनमध्ये झालेले घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या अन्य प्रकरणांचा उल्लेख करत मोदींनी काँग्रेसच्या शासनकाळात लाच घेत मॅच फिक्सिंग करण्यात आल्याचे म्हटले आहे. जेव्हा टीमच (काँग्रेस) इतकी खराब असेल तर ती धावा काय काढणार आणि लोकांचे काम काय करणार? आम्हाला प्रत्येक मतदान केंद्रावर 5-5 शतके ठोकायची आहेत असे मोदींनी म्हटले आहे. राजस्थानातून काँग्रेसला ऑल आउट करुया

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article