For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेतील क्रिकेट आणि अर्थकारण

06:43 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेतील क्रिकेट आणि अर्थकारण
Advertisement

झटपट क्रिकेटचे पहिले तीन विश्वकप इंग्लंडमध्ये झाले. त्यानंतर भारत, पाकिस्तान. 1996 मध्ये पुन्हा आशिया खंडात स्थिरावला. त्यानंतर तो पोहोचला 1999 मध्ये इंग्लंडमध्ये. 2003 मध्ये कांगारूत. आणि 2007 मध्ये कॅरिबियन बेटांवर. या धामधुमीत क्रिकेट शारजाच्या वाळवंटात तर कधी कॅनडामधील टोरांटोत. यामधील उद्देश एकच तो म्हणजे बक्कळ पैसा.

Advertisement

आणि आता गंमत बघा, आशियाई लोकांच्या जीवावर आयसीसीमार्फत क्रिकेट चक्क अमेरिकेत स्थिरावू पाहतेय तेही t20 च्या रुपात. असो. आशियाई लोकांच्या जीवावर जर पाया होत असेल तर ते अमेरिकेसाठी सुगीचे दिवस आलेत, असेच म्हणावे लागेल. अमेरिकेसाठी ही दुधात साखरच म्हणावी लागेल. अर्थात, हे सामने कुठे होणार आहेत ते बघा. फ्लोरिडा, टेक्सास आणि न्यूयॉर्कमध्ये. नेमके याच ठिकाणी 30 टक्केपेक्षा जास्त लोक आशियाई आहेत.

परंतु वर्ल्डकपमध्ये होणारे मोजकेच सामने अमेरिकेत होणार आहेत. परंतु चर्चा मात्र अमेरिकेत t20 वर्ल्डकप होत आहे याची.

Advertisement

क्रिकेटमध्ये प्रथमच वीस संघ आयसीसीच्या इव्हेंटमध्ये बघायला मिळणार आहेत. अमेरिकेत क्रिकेटचे वऱ्हाड जात आहे यापेक्षा क्रिकेटसाठी अमेरिकेचे मार्केट कॅप्चर होत का? हाच प्रमुख उद्देश आयसीसीचा असावा. यात निश्चितच दुमत नसावं. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेत क्रिकेटऊपी चंचूप्रवेश आयसीसीला हवाय. गंमत बघा, अमेरिकेत दहा टक्के जनता आशियाई आहे. त्यामुळे जिथे आशियाई लोकसंख्या आहे तिथे आयसीसी नेहमीच घोड्यावर स्वार होते, हे आपण वारंवार अनुभवले. अमेरिकेची अर्थव्यवस्था 28 ट्रिलियन आहे. त्यातच जर अमेरिकेमध्ये t20 च्या माध्यमातून क्रिकेट ऊजलं, बहरलं, फुललं तर ती अमेरिकेसाठी फार मोठी गोष्ट असणार. त्यातच 2026 चा फुटबॉलचा वर्ल्डकप अमेरिकेत होऊ घालतोय. साहजिकच फिफा इथे खोऱ्याने पैसा मिळवणार, यात शंका नाही.

न्यूयॉर्कचे नसाऊ काउंटी मैदान केवळ पाच महिन्यात तयार करण्यात आले. क्रिकेटच्या विश्वात प्रथमच ड्रॉप इन पीचचा वापर करण्यात येणार आहे. ड्रॉप इन पिचला बाहेर बनविण्यात येतं. ही जी खेळपट्टी आहे ती सागरी मार्गाने ऑस्ट्रेलियातून फ्लोरिडा येथे आणण्यात आली. एकंदरीत येथे दहा खेळपट्ट्या असून सहा सरावासाठी आणि चार प्रत्यक्ष सामन्यांसाठी. या मैदानावरील प्रेक्षक गॅलरी ही टेम्पररी आहे. एकंदरीत या मैदानाला अडीचशे कोटी खर्च करण्यात आले, हे विशेष. एकंदरीत काय तर बास्केटबॉल, बेसबॉल आणि त्यानंतर आता क्रिकेटमार्फत सुगीचे दिवस आणण्याचा प्रयत्न ते निश्चित करत आहेत. यात त्यांना कितपत यश येते हे येणारा काळच ठरवणार आहे, एवढं मात्र खरं.

अमेरिकेत क्रिकेटसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळी भारत विऊद्ध अमेरिका असा सामना होईल, त्यावेळी भारतीय वंशज असलेला कर्णधार आणि पाकिस्तानशी निगडित असलेला वेगवान गोलंदाज त्यांच्या संघात असेल. त्याशिवाय न्यूझीलंडचा कोरी अँडरसन ज्याने जलद शतक झळकावलं होतं तोही अमेरिका संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. अमेरिकेने बऱ्याच देशांकडून खेळाडू आयात करत एक तगडा संघ देण्याचा प्रयत्न केलाय. बघू त्यांना त्यात कितपत यश येतंय ते. एकंदरीत काय, अमेरिका ही आता क्रिकेटमय झाली आहे. आजपासून त्याचा श्रीगणेशा होत आहे.

Advertisement
Tags :

.