महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डायनासोरपेक्षा प्राचीन जीव अस्तित्वात

06:45 AM Jan 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डायनासोरचे जग मानवांसाठी नेहमीच रोमांचक राहिले आहे. माणूस अजून त्यांच्याविषयी काही ना काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पृथ्वीवर एकेकाळी त्यांचेच राज्य होते असे बोलले जाते. कोट्यावधी वर्षांपूर्वी एक सूक्ष्मग्रह पृथ्वीला आदळला आणि विकासाचा सर्व क्रमच बदलून गेला. या प्रलयात डायनासोरचे अस्तित्वच संपुष्टात आले. डायनासोरला आपण जगातील सर्वात जुना जीव मानतो. परंतु प्रत्यक्षात असे नाही. डायनासोरपेक्षा जुना एक जीव अद्याप पृथ्वीवर अस्तित्वात आहे.

Advertisement

स्टेनोफोरा हा जगातील सर्वात प्राचीन जीव आहे. हा डायनासोरपेक्षा जुना जीव असून तो पृथ्वीवर अद्याप आढळून येतो. पहिल्यांदा 700 दशलक्ष वर्षांपूर्वी तो पाहिला गेला होता. तर डायनासोरची उत्पत्ति 230 दशलक्ष वर्षांपूर्वीच झाली होती. जेलिफिशसारखा दिसणारा हा जीव अद्याप महासागर किंवा मोठ्या अॅक्वेरियममध्ये पोहताना दिसून येतो. स्टेनोफोराची उत्पत्ति अशा प्राण्यांमधून झाली, ज्याचा माणसांशीही संबंध आहे. पृथ्वीवर सर्वात जुना जीव सागरी शेवाळ असल्याची चर्चा आता संपुष्टात आली आहे, कारण त्यांचे जीवाश्म सुमारे 600 दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहेत असे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या टीमने म्हटले आहे. वैज्ञानिकांना प्राणी आणि वनस्पतींदरम्यान संबंध शोधतेवेळी स्टेनोफोराविषयी ही माहिती मिळाली होती.

Advertisement

स्टेनोफोरा जेलिफिशप्रमाणेच दिसणारा जीव आहे, जो समुद्रात पृष्ठभागाखाली 4 मैलापर्यंत जातो. स्टेनोफोराच्या सिलियाचे आठ सेट असतात, ज्यांचा वापर ते महासागरांमध्ये संचारासाठी करतात.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article