क्रिएटिव्ह सोल्सच्या ‘त्योहार’ प्रदर्शनाचे उद्घाटन
पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद : नाविन्यपूर्ण वस्तू-दागिने, वस्त्रप्रावरणांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
क्रिएटिव्ह सोल्सतर्फे युके-27 फर्न हॉटेलमध्ये भरविण्यात आलेल्या ‘त्योहार’ या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी झाले. बेळगावमधील नेत्रतज्ञ डॉ. शिल्पा कोडकिणी व युवा गायिका अंतरा कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनामध्ये नाविन्यपूर्ण वस्तू, दागिने, वस्त्रप्रावरणे असल्याने पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व मान्यवरांचे स्वागत आयोजक डॉ. अनुपमा जोशी यांनी केले. प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी मोफत खुले आहे.
विविधतेने नटलेल्या या प्रदर्शनात चोखंदळ ग्राहकांना पुण्याच्या ‘पोईसेस स्टोरी’ने वॉलपिसेस, रांगोळ्या, स्केचेस तसेच दिवाळी स्पेशल झरोका इत्यादी आकर्षक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. पुण्याच्याच ‘रिद्धी कलेक्शन’मध्ये तऱ्हेतऱ्हेच्या साड्या, तयार ब्लाऊज, पुरुषांसाठी शर्ट्स उपलब्ध आहेत. बेंगळूर येथील ‘मिराया’कडे मलकॉटन, चंदेरी, मसलीनचे विविध पोशाख विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘आरोही पेटल्स’ने बेंगळूरहून डोला सिल्क, सेमीटसर, ऑरगेंजा टसरच्या भरपूर साड्या आणल्या आहेत.
चिकोडीच्या ‘बिहू क्रिएटर्स स्टॉल’ने तोरणे, विंटेज ट्रंक्स, कोरियन दागिने विक्रीसाठी आणले आहेत. निपाणीच्या ‘लाबेल चेऊ चेऊ’ने कुर्ता सेट, तयार कुर्ते तसेच उत्तम डिनरसेट विक्रीसाठी आणले आहेत. भोपाळच्या ‘सान्वी एथेनिको’ यांनी कप्तान, श्रगज् ड्रेसेस, को-ऑर्ड सेट्स आणि साड्या, चेन्नईच्या ‘तारदना’मध्ये तयार कुर्ते, कॉटन पँट्स तसेच टसर, कलमकारी व कांजीवरमच्या साड्या उपलब्ध आहेत. बेळगावच्या ‘प्रिमियम स्टोअर’मध्ये कोरियन अॅक्सेसरीज, सुंदर हँडबॅग, मोत्यांचे दागिने तसेच ‘रुह अँड कि’मध्ये फेस्टीव्ह हॅम्पर्स, भारतातील कुशल कारागिरांनी बनविलेल्या वस्तू, ऑर्गनिक मनुके, हँडब्लॉक, बाथ अँड बेड लिनन, बॉडी असेन्सशियल्स तर ‘ऐक्यम’ येथे डिझायनर सूट सेट्स व मल, चंदेरी, ऑर्गेंझा साड्या उपलब्ध आहेत.
‘पावकी क्रिएशन्स’मध्ये टसर, विष्णुपुरी, मसलीन, मुर्शिदाबाद, इलकल इत्यादी साड्या, ड्रेसेस, शिबोरी, लंबाणी, मधुबनी इत्यादी हस्तकलेचे सजलेले ड्रेसेस उपलब्ध आहेत. ‘ऑर्चिड ब्युटिक’मध्ये सिल्क ऑर्गेंझा, मसलीन ड्रेसेस आणि कोरियन हेअर अॅक्सेसरीज खरेदी करता येऊ शकतात. खऱ्या मोत्यांचे दागिने, खडे यासह इतर दागिने ‘देव ज्वेल्स’ येथे उपलब्ध आहेत. ‘सौख्या आयुर्वेद अँड क्रिएशन्स’मध्ये हँडमेड उबटन, साबण, पावडर, अभ्यंग तेल, मेणबत्त्या, दिवाळी हॅम्पर्स, इव्हिरामध्ये उपलब्ध आहेत. पोलकी व झिरकॉनचे दागिने तसेच विविध प्रकारच्या साड्या, चेरीश लाईफस्टाईलचे आकर्षण आहे. जिया प्रिंट्स अँड प्लेन्समध्ये सुंदर तयार व न शिवलेले सूट्स आहेत. ‘औरालिया’मध्ये लॅब-ग्रोन डायमंड्स व खऱ्या हिऱ्यांचे दागिने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.