शिव आणि शक्ति द्वारे आकाशगंगेची निर्मिती
जर्मनीच्या वैज्ञानिकांनी शोधला सर्वात जुना तारा
आमच्या आकाशगंगेत लाखो-कोट्यावधी तारे असून त्यांचे गाइया स्पेस टेलिस्कोपकडून अध्ययन केले जात आहे. या टेलिस्कोपच्या मदतीने जर्मनीची सर्वात मोठी वैज्ञानिक संस्था मॅक्स प्लँक इन्स्टीट्यूट ऑफ अॅस्ट्रोनॉमीने आकाशगंगेची निर्मिती करणाऱ्या दोन प्राचीन कणांचा शोध लावत त्यांना शिव आणि शक्ति असे नाव दिले आहे. निळ्या रंगाचे कण शिव आहेत, तर पिवळ्या रंगाचे कण हे शक्ति आहेत. या दोन्ही कणांनी मिळूनच आमची आकाशगंगा म्हणजेच मिल्की तयार झाली आहे. हे डॉट्स म्हणजेच कण प्रत्यक्षात ताऱ्यांच्या दोन प्राचीन लाटा असून त्यांना मिळूनच आकाशगंगेची निर्मिती बिग बँगद्वारे 200 कोटी वर्षांनी झाली होती. म्हणजेच 1200 कोटी वर्षांपूर्वी. शिव आणि शक्ति म्हणजेच निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या डॉट्सयुक्त ताऱ्यांची लाट अत्यंत जुनी आहे. यानंतरच आकाशगंगेने स्पायरल म्हणजेच वळणदार आकार घेतला आहे. याचमुळे जर्मनीच्या वैज्ञानिकांनी या ताऱ्यांच्या लाटांची नावे भगवान शिव आणि देवी शक्तीच्या नावावर ठेवले आहे. या दोघांनी मिळूनच आकाशगंगेचा पाया रचला आहे, ज्यात आम्ही राहत आहोत. मॅक्स प्लँक इन्स्टीट्यूट ऑफ अॅस्ट्रोनॉमीच्या वैज्ञानिक ख्याती मल्हान यांनी आम्ही इतक्या प्राचीन कण, ताऱ्यांचा बेल्टला शोधू शकलो याचा आनंद असल्याचे म्हटले आहे. या ताऱ्यांच्या निर्मितीनंतरच आमच्या आकाशगंगेत बदल होतोय. आम्ही या समुहांना गाइला टेलिस्कोपच्या मदतीने शोधू शकलो असे त्यांनी नमूद केले आहे. गाइयाकडून प्राप्त डाटाच्या मदतीनेच ख्याति आणि त्यांच्या टीमने या ताऱ्यांच्या समुहाच्या ऑर्बिटचा शोध लावला आहे. त्यांच्या निर्मितीचे घटक शोधले आहेत. त्यांचा वेग अणि वर्तन समजून घेतले. कारण या दोन्ही ताऱ्यांचा समूह म्हणजेच निळ्या रंगाचा शिव आणि पिवळ्या रंगाच्या शक्तिची निर्मिती खास प्रकारच्या रासायनिक मिश्रणातून झाली आहे. याचमुळे याचे नाव शिव-शक्ति ठेवण्यात आले आहे.
2022 मध्ये गाइयाने आकाशगंगेच्या अंतर्गत हिस्स्यांची छायाचित्रे मिळविली हीत. तेव्हा आमची आकाशगंगा प्राचीन ताऱ्यांनी भरलेली असल्याचे कळले होते. यानंतर आकाशगंगेच्या प्राचीन घटकांच्या शोधादरम्यान या ताऱ्यांचा शोध लागला आहे. कारण हे तारे दोन लाटांमध्ये विभागले गेले होते. ताऱ्यांच्या दोन्ही लाटांचे वर्तन वेगवेगळे आहे. परंतु या दोघांनी मिळूनच आकाशगंगेची निर्मिती केली आहे. यानंतर नव्या ताऱ्यांची भर पडत गेल्याचे ख्याति यांनी सांगितले आहे. शिव आणि शक्ति प्रोटोगॅलेक्टिक तुकडे असून ते आमच्या आकाशगंगेच्या मध्यवर्ती स्थानी आहेत. दोन्हींची ऑर्बिट ट्रॅजेक्टी समान आहे. प्रत्येक लाटेचे आकारमान 1 कोटी सूर्याइतके आहे. हे सर्व तारे 1200 ते 1300 कोटी वर्षे जुने आहेत. स्वत:च्या पूर्ण आयुष्यात तारे स्वत:च्या केंद्रस्थानी आण्विक फ्यूजन करत असतात. याद्वारे ते हायड्रोजनला हेलियममध्ये बदलतात. यानंतर हेलियमला फ्यूज करून आणखी मोठ्या घटकांमध्ये बदलतात. यानंतर हेच नंतर धातूत रुपांतरित होतात.
या ताऱ्यांची निर्मिती ब्रह्मांड प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियमचा समूह होता त्या काळात झाली होती. त्यावेळी धातूची कमतरता होती, पहिल्या ताऱ्यांचा समूह संपुष्टात आल्यावर ते सुपरनोव्हा झाले आणि पूर्ण ब्रह्मांडात फैलावत गेले. दुसऱ्या पिढीच्या ताऱ्यांमध्ये पुन्हा धातूंचे मिश्रण सुरू झाले, अंतराळात ताऱ्यांचा जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्माची प्रक्रिया सातत्याने चालत राहिली आणि आजही सुरू आहे. परंतु प्राचीन ताऱ्यांनीच म्हणजेच शिव-शक्तिने आमच्या आकाशगंगेचे केंद्रस्थान सुरक्षित, संतुलित आणि नियंत्रित ठेवले आहे. शिव-शक्ति ताऱ्यांमध्ये अनेक समानता आहेत तसेच कित्येक फरक देखील आहेत. शक्ति ताऱ्यांची लाट आमच्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानापासून दूर आहे. तर शिव तारे आकाशगंगेच्या नजीकच्या वर्तुळाकृती कक्षेत फिरत असतात.