शेतांमध्ये अजब डिझाइनची निर्मिती
अनेकांना एलियन्सवर संशय : रहस्य अद्याप कायम
आकाशातून कुठल्याही शेतात दिसणाऱ्या आकृती अनेकदा रहस्य अन् चर्चेचा विषय ठरतात. ब्रिटनमध्ये आता अनेक गावांच्या शेतात अजब डिझाइन दिसून आल्या आहेत. काउंटी क्रॉप सर्कल नावाने प्रसिद्ध या आकृत्या ब्रिटनमध्ये 1970 मध्ये चर्चेत राहिल्या आहेत आणि यंदा पुन्हा या चर्चेत आहेत. यावेळी स्टोनहेंजपासून केवळ 13 मैल अंतरावर विल्टशायरमध्ये या आकृत्या निर्माण झाल्या आहेत. मागील आठवड्यात सटन वेनीमध्ये एका शेतात जटिल प्रकारच्या ज्यामितीय डिझाइन्स दिसून आल्या. तेव्हापासून हे रहस्यमय क्रीप सर्कल पुन्हा चर्चेत आहे.
वेगवेगळ्या आकृत्यांचे पॅटर्न
यात सेल्टिक नॉट किंवा चौकोनी ताऱ्यासारखा पॅटर्न होता, हा एका वर्तुळाच्या आत होता. परंतु हे केवळ एकाच ठिकाणी आढळून आले असेही नाही. 30 मैल अंतरावरील डोरसेटमध्ये देखील अनोखे क्रॉप सर्कल आढळून आले. यात दोन सर्कल्स होती, यातही ज्यामितीय आकृत्या होत्या, क्रॉप सर्कल शेत किंवा मोठ्या गवतात निर्माण होणाऱ्या रहस्यमय आकृत्या आहेत.
एलियन्स का आणखी काही?
या आकृत्या सर्वसाधारणपणे रात्री निर्माण होतात. हा एलियन्सचा संदेश असल्याचे युएफओ सिद्धांतवादी मानतात. तर काही लोक याला कला किंवा थट्टा मानतात. काही सर्कल 1000 फूट लांब असतात तरीही त्यांना निर्माण करण्यास काही मिनिटे लागतात. हे सर्कल अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्येही आढळून आले आहे. परंतु सर्वाधिक ब्रिटनमध्ये दिसून येतात. ब्रिटनमधील 80 टक्के क्रॉप सर्कल विल्टशायरमध्ये मिळाले आहेत. 2005 पासून आतापर्यंत येथे 380 हून अधिक सर्कल्सची नोंद झाली आहे.
कधी होते निर्मिती
हे सर्वसाधारणपणे मे ते ऑगस्टदरम्यान निर्माण होतात. या काळात पिकं मोठी झालेली असतात. या सर्कल्स माणूस एका रात्रीत निर्माण करू शकत नसल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. तर सर्कल निर्माण होण्यापूर्वी शेतांवर प्रकाशझोत अन् अजब किरणे दिसुन आल्याचा काही जणांचा दावा आहे. विल्टशायरमध्ये क्रॉप सर्कल पर्यटकांना आकर्षित करतात. लोक त्यांना पाहण्यासाठी दूरवरून येत असतात.
शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक
क्रॉप सर्कलमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. वैज्ञानिक अणि संशोधक या सर्कल्सचे अध्ययन करत आहेत. हे सर्कल्स कशाप्रकारे तयार होतात हे जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे सर्कल्स नैसर्गिक ऊर्जेने निर्माण होतात असे काही जणांचे मानणे आहे. तर हे प्रगत तंत्रज्ञानामुळे घडत असल्याचे इतरांचे सांगणे आहे.