For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करा

10:38 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करा
Advertisement

जि.पं. सीईओ राहुल शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

बेळगाव : येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यात यावा. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदार संघांची नोंद घेऊन अधिकाऱ्यांनी स्वत:हून भेट देऊन जनजागृती करावी, अशी सूचना चिकोडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना महत्त्व देऊन मतदान जनजागृती करण्यात यावी. जनजागृतीची माहिती केवळ नावापुरता न करता मतदार संघात नियोजन करून जागृती करण्यात यावी. तालुक्यानुसार क्रिया योजना तयार करून अहवाल देण्यात यावा. शहर आणि ग्रामीण भागात दररोज लाऊड स्पीकरच्या साहाय्याने जागृती मोहीम राबविण्यात यावी. 80, 90 आणि 100 वर्षांवरील मतदारांची नोंद घेण्यात यावी. पोस्टल बॅलेट मतदानाबाबत तसेच मतदान करण्यासाठी येणे शक्य नसलेल्या मतदारांना अधिकाऱ्यांनी स्वत:हून भेट देऊन यादी तयार करण्यात यावी. संवेदनशील मतदार संघांमध्ये अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करण्यात यावी. आवश्यक ती तयारी करून मतदारांमध्ये जागृती करावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी मनपा आयुक्त पी. एन. लोकेश, स्मार्टसिटी योजना अधिकारी सोमलिंग गेन्नूर, जिल्हा औद्योगिक पेंद्राचे साहाय्यक संचालक सत्यनारायण भट्ट, रेखा डोळीण्णावर, नगर योजना अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, चिकोडी, बेळगाव, रायबाग, अथणी, निपाणी, कागवाड, हुक्केरी पंचायतींचे तालुका अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.