योद्ध्याच्या स्मरणार्थ क्रेझी हॉर्स मेमोरियल
पर्वतावरील सर्वात मोठे नक्षीकाम ठरणार
जगात एक असे स्मारक आहे, जे निर्मितीपूर्वीच प्रसिद्ध ठरले आहे. या स्मारकाच्या निर्मितीचा उद्देश मूळ अमेरिकन लोकांचे देखील स्वत:चे नायक आहेत हे सांगणे आहे. मागील 75 वर्षांपासून व्रेझी हॉर्स मेमोरियल निर्माण केले जात आहे. ते पूर्ण होण्याआधीच लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. अमेरिकेच्या साउथ डकोटाच्या ब्लॅक हिल्समध्ये वसलेला हा विस्मयकारी प्रकल्प केवळ एका मूर्तीपेक्षा खूप काही आहे. हा लवचिकपणा, गर्व आणि सांस्कृतिक संरक्षणाचे प्रतीक आहे. प्रारंभापासून तो पूर्ण करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांपर्यंत क्रेझी हॉर्स मेमोरियलचा प्रत्येक पैलू भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याची एक आकर्षक झलक सादर करतो. क्रेझी हॉर्स ओग्लाला लकाटो लोकांचा एक सन्मानित योद्धा होता, जो अमेरिकेच्या संघीय सरकारच्या मूळ अमेरिकनांच्या भागांवर अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात स्वत:च्या तीव्र लढ्यासाठी ओळखला जात होता. स्वत:च्या लोकांच्या जीवनाच्या पद्धतीला संरक्षित करण्यासाठी त्याचे समपण आणि 1876 मध्ये लिटिल बिगहॉर्नच्या लढाईतील त्याच्या भूमिकेने त्याचा वारसा मजबूत झाला. आजही त्याला मूळ अमेरिकनांचा नायक म्हणून ओळखले जाते.
पोलिश वंशाचे अमेरिकन मूर्तिकार कोरजाक जिओलकोव्स्की यांनी 1948 मध्ये लकोटा प्रमुख हेन्री स्टँडिंग बियरच्या विनंतीनुसार क्रेझी हॉर्स मेमोरियलची सुरुवात केली होती. एक भव्य स्मारक उभारण्याचे त्यांचे स्वप्न होते. मूळ अमेरिकन संस्कृतीबद्दल सन्मान आणि आदर या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी आहे. क्रेझी हॉर्स मेमोरियलची निर्मिती 70 पेक्षा अधिक वर्षांपासून सुरू आहे. यामुळे जगातील सर्वाधिक काळापर्यंत चाललेल्या निर्मितीप्रकल्पांपैकी हा एक ठरला आहे. या प्रकल्पाला कुठल्याही सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. हा प्रकल्प पूर्णपणे वैयक्तिक देणगी आणि पर्यटकांकडून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर निर्भर आहे. क्रेझी हॉर्स मेमोरियल पूर्ण झाल्यावर ते 563 फूट उंच आणि 614 फूट लांब असणार आहे. यामुळे ते माउंट रशमोर नॅशनल मेमोरियलपेक्षाही खूप मोठे असेल. याचे शीरच 87 फूट उंच आहे. तर माउंट रशमोरमध्ये अध्यक्षांचे शीर 60 फूट उंच आहे. आतापर्यंत क्रेझी हॉर्सचा चेहरा पूर्ण झाला असून त्याचे अनावरण 1998 मध्ये करण्यात आले होते.