For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रॉले कसोटी मालिकेतून बाहेर

06:01 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्रॉले कसोटी मालिकेतून बाहेर
Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

Advertisement

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने 14 सदस्यांचा संघ जाहीर केला. दरम्यान सलामीचा फंलंदाज झॅक क्रॉले याला दु:खापतीमुळे या मालिकेसाठी वगळण्यात आले आहे. या मालिकेकरिता स्टोक्सकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

विंडीज विरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात खेळताना क्रॉलेच्या उजव्या हाताच्या करंगळीचे हाड मोडले होते. त्याच्या या बोटाला प्लास्टर घालण्यात आले असून त्याला किमान 4 आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे.

Advertisement

इंग्लंड संघ-स्टोक्स (कर्णधार), अॅटकिनसन, शोएब बशीर, ब्रुक, कॉक्स, डकेट, लॉरेन्स, ओलि पॉप, रुट, स्मिथ, स्टोन, वोक्स आणि मार्क वूड.

Advertisement
Tags :

.