महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जोशीमठमध्ये पुन्हा जमीन, घरांना तडे

06:45 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकांमध्ये भीतीचे वातावरण

Advertisement

वृत्तसंस्था/ चमोली

Advertisement

उत्तराखंडमधील जोशीमठ अर्थात ज्योतिर्मठ नगर परिसरात पुन्हा एकदा पावसाळ्यात काही ठिकाणी घरे, इमारती आणि जमिनीला भेगा निदर्शनास येऊ लागल्या आहेत. मनोहर बाग येथील पायी मार्गावर अनेक ठिकाणी जमिनीला तडे गेले आहे. तसेच भूस्खलन व दरड कोसळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जमीन खचल्याने घरांचे पुन्हा नुकसान होत आहे. अशा स्थितीत नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जवळपास 19 महिन्यांपूर्वी जानेवारी 2023 मध्ये याच भागात दरड कोसळल्याने भेगा पडल्या होत्या. यानंतर अनेक वैज्ञानिक संस्थांनी सर्वेक्षण केले. शहर परिसरातील 800 हून अधिक घरांचे सर्वेक्षण करून ते रेड झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय संपूर्ण शहराची 14 सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली असून त्यामध्ये वेगवेगळे सेक्टर तयार करण्यात आले आहेत. शहराची उच्च जोखीम क्षेत्र, मध्यम व कमी जोखीम क्षेत्र आणि ग्रीन झोन अशी विभागणी करण्यात आली आहे.

सध्या राज्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसानंतर आता ज्योतिर्मठ येथील रवी गाव परिसरात काही ठिकाणी भेगा पडल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सुनील वॉर्डातील देवेंद्र नौटियाल व सौरव नौटियाल यांच्या घरांना जोडणाऱ्या पदपथाची भिंत तुटली आहे. शहर परिसरात आजपर्यंत एकही मोठी घटना घडली नसली तरी काही समस्या उद्भवल्यास त्या सोडवल्या जातील, असे तहसील प्रशासनाचे म्हणणे आहे.

ज्योतिर्मठ नगर येथील दुर्घटनेला जवळपास 19 महिने होत आले आहेत, मात्र अद्याप पीडित कुटुंबे विस्थापित झालेली नाहीत. आजही लोकांना भेगा पडलेल्या घरात राहावे लागत आहे. ज्योतिर्मठमधील 800 हून अधिक घरांना तडे गेले आहेत. यापैकी 215 घरे राहण्यास योग्य नाहीत. येथे कधीही मोठा अपघात होऊ शकतो. परंतु तरीही या घरांमध्ये लोक राहत आहेत. या घरांमध्ये राहणे धोक्मयाचे आहे. शासनाने घरासाठी पैसे दिले असले तरी जमिनीचे पैसे अद्याप मिळाले नसल्याचे बाधितांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article