कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सायबर तस्करीच्या अजगरी विळख्याला तडे

06:28 AM Aug 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशात सायबर तस्करांनी बसविलेल्या बस्तानाला तपास यंत्रणांनी चांगलेच हादरे दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सायबर तस्कारांना सळो की पळो कऊन सोडले आहे. गेल्या दोन वर्षात मुंबई पोलिसांनी सायबर तस्करांच्या कचाट्यातून 300 कोटी ऊपये वाचविले आहेत. तर 60 लाख खाती गोठवित त्यांच्या अजगरी विळख्याला चांगलेच तडे दिले आहेत.

Advertisement

जग तिसऱ्या पण महासंहारक अशा युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. एकविसाव्या शतकात अनेक राष्ट्रे एकमेकांच्या मुळावर उठली आहेत. यामध्ये महत्त्वाची भूमिका बजाविण्याचे काम करीत आहे ते सायबर प्रणाली आणि सायबर तस्कर. सायबरचे अस्त्र ज्याप्रमाणे देश तसेच देशवासियांच्या भल्यासाठी आहे. तसेच त्याचा विध्वंसासाठी देखील वापर केला जात आहे. केवळ देशच नाही तर सायबर तस्कराच्या हल्यात निष्पाप नागरिक देखील बळी पडत आहेत. त्यांच्या आयुष्यभराच्या कमाईवर सायबर तस्कर डल्ला मारत नामानिराळे रहात आहेत. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून सायबर तस्कराच्या अजगरी विळख्याला तडे बसण्यास सुऊवात झाली आहे.

Advertisement

सायबर तस्करांना दणका देण्यासाठी मुंबई पोलिसांनी 24 तास कॉल सेंटर सुऊ केले आहे. गेल्या दोन वर्षात सायबर तस्करांच्या कचाट्यातून 300 कोटी ऊपये वाचविण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. या कॉल सेंटरला दररोज दोन हजाराहून अधिक फोन येत आहेत. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी 60 लाख खाती गोठवित सायबर तस्करांच्या अजगरी विळख्याला चांगलाच दणका दिला आहे. हे केवळ मुंबई महाराष्ट्रातच झाले नाही. तर देशभरातून देखील सायबर तस्करांना धक्के बसण्यास सुऊवात झाली आहे. देशभरातील 100 च्यावर स्त्राr-पुऊषांना ‘डिजिटल अटके’ची भीती दाखवून कोट्यावधी ऊपयांची खंडणी उकळणाऱ्या 9 सायबर माफियांना बंगालच्या कल्याणी न्यायालयाचे सत्र न्यायाधीश सुबर्थी सरकार यांनी नुकतीच जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. महाराष्ट्र, हरयाणा आणि गुजरातमधील हे 9 आरोपी असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे.

सायबर गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा होण्याची या देशातील ही पहिलीच वेळ आहे. हा खटला सहा महिने चालला. त्यात चार राज्यांतील 29 साक्षीदार तपासले गेले. त्या साक्षीदारांमध्ये मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. या निकालाविऊद्ध आरोपी उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. मात्र बंगाल पोलिसांनी मोबाईल, सिमकार्ड, बँक पासबुक, एटीएम कार्ड आदी यंत्रसामग्री जप्त केलेली आहे. हे पुरावे जन्मठेपेची शिक्षा कायम करण्यासाठी पुरेसे आहेत. खंडणीसाठी डिजिटल अटकेची भीती दाखविणाऱ्या व आर्थिक दहशतवाद निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे, अशीही न्यायालयाने टिप्पणी केली आहे. कोलकात्याच्या सत्र न्यायालयाने नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली मात्र याचा सायबर माफियांवर अद्याप परिणाम झालेला दिसत नाही. रोज ऑनलाइन फसवण्याचे गुन्हे घडतच आहेत. मुंबईत किमान दोन तरी व्यक्तींना सायबर माफिया फसवतात व ही फसवणूक कोटींमध्ये असते. डिजिटल अरेस्ट म्हणजे आभासी अटक. आपण सीबीआय, पोलीस, ईडी, इनकम टॅक्स, कस्टम आदी प्राधिकरणांचे अधिकारी असल्याचे भासवून जे अज्ञात माफिया फोन करतात, ते तक्रारदाराला म्हणतात “आपण फ्रॉड केला आहे, आपला अंमली पदार्थांच्या तस्करीत, मनी लॉण्डरिंगमध्ये सहभाग आहे,” अशी वेगवेगळी कारणे सांगून आपणास डिजिटल अटक करण्यात आल्याचेही भासवतात.

गुह्यात आपल्या मोबाईलचा, आधारकार्डचा, बँक खात्याचा वापर झाला आहे असे सांगून घाबरवून सोडतात. आपली जामिनावर सुटका व्हावी असे वाटत असेल तर आम्ही नमूद केलेल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करा, असेही बजावले जाते. डिजिटल अटकेला घाबरलेले बरेच लोक आपले घरदार, दागदागिने विकतात, कर्ज काढतात किंवा बँकेत जमा असलेली रक्कम सायबर माफियांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करतात. सायबर माफियांची ही कार्यपद्धती देशभरात सुरू असताना आता ज्या ठिकाणी समभाग किंवा शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते, त्या शेअर मार्पेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात करोडो ऊपयांची फसवणूक करण्याचे नवे सत्र सुरू झाले आहे. गुंतवणुकीशी संबंधित फसव्या जाहिराती ऑनलाइन दिल्या जातात. गुंतवणूकदारांना एसएमएस करून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवतात. फोन करून आपण बड्या वित्त संस्थेमध्ये उच्च पदावर असल्याचेही सांगितले जाते आणि आपल्या फ्रॉड व्हॉटसअॅपच्या ग्रुपमध्ये सामील करून गुंतवणूकदारांची फसवणूक केली जाते.

दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथील बहुचर्चित ‘प्रभुकुंज’ या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका 57 वर्षीय व्यावसायिकाने इन्स्टाग्रामवर शेअर्स गुंतवणूकविषयक जाहिरात पाहत असताना एका आकर्षक जाहिरातीवर क्लिक केले. तेव्हा त्यांना पटकन सरोज गुप्ता नामक तऊणीचा मेसेज आला. या व्यावसायिकाला आपल्या कंपनीच्या

व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्याचे त्या महिलेने सांगितले. आमच्या कंपनीकडून कोणत्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे याची ‘टीप’ दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला भरघोस नफा मिळेल असेही त्या महिलेने त्या व्यावसायिकाला सांगितले. सरोज गुप्ता नावाची ही महिला व तिचे साथीदार या व्यावसायिकाला रोज कोणते शेअर्स खरेदी करायचे याची टीप द्यायचे.

त्याप्रमाणे ते व्यावसायिक शेअर्स खरेदी करायचे. लाखाचे दोन लाख झाले. दोन लाखांचे वीस लाख झाले, अशी शेअर्सची रक्कम वाढल्यानंतर या व्यावसायिकाचा मोह वाढला. तेव्हा त्याने दोन महिन्यांत पाच कोटी ऊपये गुंतवले. त्याचे जेव्हा 50 कोटी झाले तेव्हा त्या व्यावसायिकाने बँक खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या बँक खात्यातून एक ऊपयाही ट्रान्सफर झाला नाही. व्हॉटसअॅप ग्रुप खोटा होता. कंपन्या बोगस होत्या. त्याला टीप देणारे बनावट होते असे लक्षात आल्यावर त्या व्यावसायिकाने दक्षिण मुंबईतील सायबर सेलकडे धाव घेतली. तोपर्यंत त्या व्यावसायिकाचा सारा पैसा परदेशात ट्रान्सफर झालेला होता. फसवणूक झालेल्यामध्ये कोणी अशिक्षित नाहीत तर डॉक्टर, वकील, बड्या बड्या कंपन्यांचे डायरेक्टर आहेत. शेअर बाजारातील भरघोस परताव्याच्या आमिषाला बळी पडत आहेत. दरवर्षी सायबर क्राइम शेकडो पटीने वाढत आहे. गेल्या वर्षी (2024) 23 हजार कोटी ऊपयांची परदेशी सायबर माफियांनी आपल्या देशवासीयांची 37 लाख लोकांची फसवणूक केली आहे. तर मुंबई पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अनेक नागरिकांच्या आयुष्याची पुंजी परत मिळाली आहे. तसेच अनेकदा मुंबई पोलिसांनी सायबर तस्करांना दणके देत त्यांच्या अजगरी विळख्याला तडे दिले आहेत.

अमोल राऊत

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article