दरड कोसळी पण मार्ग सुस्थितीत ! वाहनधारकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
कसबा तारळे वार्ताहर
गुडाळवाडी- करंजफेण मार्गे राधानगरी जाणाऱ्या रोडवर दरड कोसळून रस्ता बंद झाल्याचा बातम्या सोशलमीडीयावर फिरत राहील्याने झाल्यानंतर करंजफेण येथील ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक प्रशासनाने जाग्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी केल्यानंतर दरड कोसळली असली तरी या मार्गावरिल वाहतूकीला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं त्यांनी जाहीर केलं.
कोसळलेल्या दरडीची बातमी व्हारल झाल्यानंतर गावच्या पोलीस पाटील सविता पाटील, राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे, तलाठी रणजित कुंभार, गुडाळ गावचे तलाठी पी.आय. गुरव, करंजफेण गावचे सरपंच संतोष वागरे कोतवाल अविनाश कांबळे, कुमार कांबळे यांनी या मार्गाची पहाणी केली. ही दरड मोठ्या प्रमाणात कोसळली नसून त्यामुळे वाहतूकीस कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं त्यांनी सांगितले. पण तरीही मुसळधार पावसामध्ये रस्त्यावर दरड कोसळण्याची शक्यता असल्याने वाहनधारकांनी तसेच पादचाऱ्यांनी दक्षता घेण्याचेही आवाहन त्यांच्या कडून करण्यात आले. गावच्या पोलिसपाटील सविता पाटील यांनी तसेच नेसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी संपर्क साधून कोसळलेली दरड काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत,