...अन् सीपीआर दिल्याने वाचला बाळा जीव! संगमेश्वर-तुरळ अपघातात गाडीतून फेकले गेले होते बाळ
डॉ. अमोल पवार यांनी दिले जीवनदान
चिपळूण प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-हरेकरवाडी येथे बुधवारी बोलेरो पिकअप आणि दाकी यांयात झालेल्या भीषण अपघातात अडा वर्षो बाळ गाडीबाहेर फेकले गेले. यावेळी तेथून रत्नागिरीला जात असलेले ऑन्को-लाईफ केअर कॅन्सर सेंटरचे डॉ. अमोल पवार यांनी या बाळी तपासणी केली. त्याया हृदयाचे ठोके बंद पडलेले असल्याने त्यांनी त्याला सीपीआर देऊन त्या जीव वाचवला.
अपघातानंतर गाडीबाहेर फेकले गेलेल्या या बाळाला रस्त्यावरील एका चालकाने पाहिले आणि त्याला उचलून घेतले. याच मार्गावरून डॉ. पवार हे प्रवास करत होते. या बाळाला पाहताच डॉ. पवार यांनी प्रसंगावधान राखत सीपीआर देण्यास सुरुवात केली. बाळाच्या हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले होते. मात्र अवघ्या काही मिनिटातच बाळाने सीपीआर प्रक्रियेला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे डॉ. पवार यांनी त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. आपल्या गाडीतून त्यांनी बाळ व त्याच्या कुटुंबियांना 15 कि.मी. अंतरावरील संगमेश्वर येथील रुग्णालयात नेले. या प्रवासादरम्यानही बाळाला सीपीआर देण्यात आला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच बाळ स्थिरावून त्याचा श्वास पूर्ववत झाला होता.
सीपीआर दिल्यास जीव वू शकतो
आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीमध्ये तातडीचे उपचार म्हणून सीपीआरचा वापर केला जातो. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सामान्य होण्यास मदत होते. सीपीआर देण्याची एक विशिष्ट पद्धत असते. जिचा वापर करून अनेकांचा जीव वाचवता येऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छवास किंवा हृदयाचे ठोके बंद झाले असतील तर पुरेशा ऑक्सिजनअभावी तिच्या शरीरातील पेशी मृत होऊ लागतात. या गोष्टीचा व्यक्तीच्या मेंदूवर परिणाम होतो. यामुळे काहीवेळा व्यक्तीचा मृत्यूदेखील होतो. अशा परिस्थितीत सीपीआर दिल्यास जीव वाचू शकतो.
-डॉ. अमोल पवार, चिपळूण