For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक्स्ट्रीम सिक्युरिटीतर्फे सीपीआर-फर्स्टएड कॅज्युलिटी हेडलिंग प्रशिक्षण

11:32 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
एक्स्ट्रीम सिक्युरिटीतर्फे सीपीआर फर्स्टएड कॅज्युलिटी हेडलिंग प्रशिक्षण
Advertisement

बेळगाव : टिळकवाडी येथील एक्स्ट्रीम सिक्युरिटीची चौदावी वार्षिक सभा शनिवारी हॉटेल सेंतोरिनी येथे पार पडली. यावेळी बेळगाव मुख्य कार्यालयासह शिनोळी, हुबळी व कोल्हापूर येथील एक्स्ट्रीमच्या शाखेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाच व दहा वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा लाँग सर्व्हिस अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांना सीपीआर व फर्स्टएड कॅज्युलिटी हेडलिंगचे ट्रेनिंग देण्यात आले. दहा वर्षे सेवा दिलेले कृष्णा पाटील, विनायक बम्मनवाडी व पाच वर्षे सेवा दिलेल्या रघुनाथ देसाई, कृष्णा पाटील, संजय मंजरगी, भारती मनोळकर, आरती ताशिलदार यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात प्रत्येक विभागप्रमुखांनी भविष्यातील कंपनी विस्ताराबाबत मार्गदर्शन केले. कंपनीचे एमडी इंद्रजित प्रधान, सीईओ संदीप अष्टेकर, सीएओ मनीषा अनगोळकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.

Advertisement

कंपनीचे ट्रेनिंग मॅनेजर यशवंत पाटील, ट्रेनिंग  ऑफिसर मारुती पाटील यांनी सीपीआर ट्रेनिंग आणि फर्स्टएड कॅज्युलिटी हेडलिंग या विषयावर कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकासह माहिती दिली. हार्टअटॅक आल्यास जीव वाचविण्यासाठीची खबरदारी तसेच कोणताही आजार असताना  हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले. एक्स्ट्रीम कंपनीद्वारे उद्यमबाग, नावगे, मच्छे, शिनोळी, कोल्हापूर, हुबळी व बेळगाव येथे विविध औद्योगिक भागांमध्ये सुरक्षा प्रदान करण्यात येते. सर्व कंपन्यांना सीपीआर, फर्स्टएड आणि मॉकड्रिल प्रशिक्षण कंपनीतील कर्मचारी तसेच सुरक्षावर्गाला आयोजन करून देत आहे. अपघात टाळता येईल व आकस्मिक वेळेला हॉस्पिटलपर्यंत जाण्याआधी प्रथमोपचार घेता येईल, अशी माहिती इंद्रजित यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेश मोडेकर, आरती ताशिलदार, ज्योती कणबरकर, लक्ष्मण फडतरी यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन आरती गशी व गौतमी धुरी यांनी केले. देवेंद्र हनुमण्णावर यांनी आभार मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.