महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अयोध्येतील सोहळ्यात सामील होणार नाही माकप

06:51 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृंदा करात यांनी केली भूमिका स्पष्ट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित होणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अनेक महनीय सहभागी होणार आहेत. तर या सोहळ्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सहभागाबद्दल साशंकता आहे. याचदरम्यान मंगळवारी माकप नेत्या वृंदा करात यांनी आमचा पक्ष या सोहळ्यापासून अंतर राखणार असल्याचे म्हटले आहे.

आमचा पक्ष अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सामील होणार नाही. या निर्णयामागे आमची मूलभूत विचारसरणी आहे. आम्ही धार्मिक प्रथांचा आदर करतो, परंतु भाजप एका धार्मिक कार्यक्रमाला राजकारणाशी जोडू पाहत आहे. धार्मिक कार्यक्रमाचे राजकीयकरण करणे योग्य नसल्याचे वृंदा करात म्हणाल्या. धर्माला राजकीय अस्त्र करणे योग्य नाही. हिंदुस्थानच्या सत्तेने कुठलाही धार्मिक रंग अवलंबू नये असे माकप नेत्या करात यांनी म्हटले आहे.

सर्वांना निमंत्रण पाठविले असले तरीही भगवान रामाने बोलाविले आहे असे लोकच या सोहळ्याकरता अयोध्येत येणार असल्याचे म्हणत केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी वृंदा करात यांच्यावर निशाणा साधला आहे.

यापूर्वी राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील सहभागाविषयी भूमिका मांडली होती. हा पूर्ण मुद्दा केवळ देखावा आहे. भाजप रामाविषयी बोलतो, परंतु त्यांचे वर्तन हे कुठल्याही प्रकारे भगवान रामाच्या जवळही पोहोचू शकत नाही माझ्या मनता राम आहे, मी कुठल्याही देखाव्यासाठी काम करत नाही. भगवान रामाने मला इथपर्यंत पोहोचविले आहे याचा अर्थ मी काहीतरी चांगले करत असेन असे सिब्बल म्हणाले.

सप खासदार डिंपल यादव यांनी अयोध्येतील रामल्ला सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नसल्याचे म्हटले आहे. निमंत्रण मिळाले नसले तरीही आम्ही अयोध्येतील सोहळ्यात सहभागी होणार आहेत. बहुधा मुख्य दिनी आम्ही जाऊ शकलो नाही तरीही पुढील काळात अयोध्येत पोहोचू असे डिंपल यादव म्हणाल्या.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article