इंग्लंड संघात कॉक्स, रेहान
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा संघ पुढील आठवड्यात विंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका आणि त्यानंतर 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या दौऱ्यासाठी इंग्लंड संघाने यष्टीरक्षक आणि फलंदाज जॉर्डन कॉक्स आणि फिरकी गोलंदाज रेहान अहम्मद यांना जादा खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.
सध्या पाकबरोबर सुरू असलेल्या कसोटी मालिकेत जॉर्डन कॉक्स आणि रेहान अहम्मद इंग्लंड संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. रावळपिंडीतील तिसरी आणि शेवटची कसोटी संपल्यानंतर 28 ऑक्टोबर कॉक्स आणि रेहान कॅरेबियन टूरवर इंग्लंड संघासमवेत जातील. विंडीज दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड संघात टी-20 मालिकेसाठी बटलरचे पुनरागमन झाले आहे. लिव्हिंगस्टोनकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना अॅन्टीग्वॉ येथे 31 ऑक्टोबरला होईल. तर 10 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेला प्रारंभ होईल.
इंग्लंड संघ : लियाम लिव्हिंगस्टोन (कर्णधार), रेहान अहम्मद, आर्चर, बेथेल, चोहान, कॉक्स, सॅम करन, जॅक्स, शकीब मेहमुद, डॅन मोसेली, ओव्हर्टन, अदिल रशीद, सॉल्ट, टॉप्ले, टर्नर.