For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भित्रा ससा...

06:11 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
भित्रा ससा
Advertisement

एकदा जंगलात खूप मोठं वादळ आलं आणि सगळे प्राणी झाडाच्या आडोशाने जीव वाचवायला लपून बसले. वादळ जरा शांत झाल्यानंतर खूप धूळ आणि पाने उडाली होती. अशातच झाडाखाली आपल्या बिळामध्ये दबा धरून बसलेल्या सशाच्या पाठीवरती झाडाचे वाळलेल्या पान पडले. सशाला वाटले इतके मोठे वादळ आले म्हणजे आभाळ सुद्धा हलले असणार आणि त्याचा तुकडा आपल्या पाठीवर पडला असणार! ससा घाबरत घाबरत बाहेर आला इकडे तिकडे बघितले इतक्मयात त्याला समोर काही प्राणी दिसले. ससा म्हणाला आता आपले काही खरे नाही, माझ्या पाठीवर आभाळ पडलय आपण सगळे आभाळाखाली गुदमरून मरून जाणार! इथून लवकर बाहेर पडूया. सगळे प्राणी त्याच्या मागे पळायला लागले आणि शेवटी ही सगळी वरात वाघाकडे आली आणि वाघाने रागावून सांगितले तुझ्या पाठीवर झाडाचे पान पडलय... मग मात्र सगळेजण शांत झाले ही गोष्ट ऐकल्यानंतर मला आपल्या मध्येच असा एखादा ससा दडलेला असावा अशी खात्रीच पटली. अशा अनेक अनामिक गोष्टींची भीती आम्ही कायम बाळगत असतो. जगातले करोडो लोक या भित्र्या सशाचेच वंशज असतात. अगदी बाराव्या दिवशी नामकरण केल्यानंतर बाळाच्या डोक्मयावर ओवाळून जो कापूस ठेवला जातो त्याची सुद्धा भीती बाळाच्या मनामध्ये असतेच. मुलगा झाला तर वंशाचा दिवा आणि मुलगी झाली तर तिच्या जन्माबरोबर तिचे पालन पोषण, सुरक्षितता, हुंडा, लग्न, तिच्या सासरची माणसे अशा कितीतरी गोष्टींची भीती आमच्या मनामध्ये मूर्तीमंत उभी राहते आणि आमच्यातले भित्रेससे असे कावरेबावरे होऊन धावायला लागतात.

Advertisement

आरोग्याची चिंता असणारे ससेसुद्धा सकाळी उठल्यापासून आपला कुठला अवयव दुखत नाही ना हे सारखे तपासून बघत असतात आणि कुठे काही वाटलेच तर ताबडतोब औषध उपचार सुरू करतात. त्यातला जो उपाय लागू पडेल तो ताबडतोब मित्रमंडळींना, नातेवाईकांना अन्

व्हॉट्सअॅप ग्रुपवरती सगळ्यांना कळवत राहतात. रोगाची लक्षणे उपाययोजना तज्ञ डॉक्टर याची यादीच पाठवतात. हे सगळे वाचून आपल्याशी असेच काहीतरी होते असे विचार करणारे अनेक ससे लगेच कामाला लागतात.

Advertisement

सध्या तर गुगल डॉक्टरच्या सल्ल्याने वागणारे ससे सुसाट पळताना दिसतात. आपल्याला खरंच काही झालेय का याचा विचार सुद्धा करायला त्यांना वेळ नसतो आणि निर्णय घ्यायची घाई झालेली असते. एखादे औषध आपल्याला लागू पडत नसेल तरी अमुक एकाने सुचवले म्हणून घ्यायला सुऊवात देखील करतात. अशा भित्र्या सश्यांना कसे आवरायचे? हाच मोठा प्रश्न आहे कोरोना काळात तर असे लाखो भित्रे ससे बिळात जरी लपून बसले तरी

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भीती पसरवण्याचे काम उत्साहाने करत होते. खाद्यपदार्थांच्या बाबतीत आहाराच्या बाबतीत सुद्धा अशा सश्यांची आघाडी असते.

सकाळी फिरायला गेले की अमुक एक पदार्थ ज्यूस, काढे प्यायले की आरोग्य उत्तम राहते हे कळते म्हणजे लगेच त्या पदार्थाची मागणी वाढते. म्हातारपणी सुद्धा डिंकाचा लाडू खाऊन ताकद येईल, असे वाटणारे अनेक ससे जगामध्ये आहेतच. परंतु अशा पदार्थांनी आपली प्रकृती सुधारण्यापेक्षा ती बिघडण्याची जास्त शक्मयता असते. याची मात्र जाणीव त्यांना नसते. काही राजकीय ससे मात्र स्मार्ट असतात, त्यांच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवरती कुठलाही डाग पडू नये यासाठी ते आपल्या मागे वाघ, चित्ता, सिंह, हत्ती अशा अजस्त्र प्राण्यांची चित्र लावतात आणि ससा ऊपी जनतेच्या पाठीवर वेगवेगळ्या विषयांचे तुकडे टाकून त्यांना सतत घाबरवत राहतात. कधी धर्म, तर कधी भ्रष्टाचार, कधी आरक्षण, कधी बेरोजगारी, भित्रे ससे लगेच धावायला लागतात. कुठलाही विचार न करता सगळ्यांना सांगत सुटतात. या तंत्राचा वापर आत्ताच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाच.

तसा तो महाभारतात देखील पाहायला मिळतो. पुराण काळापासून अशी मंत्रयुद्धाची दिशाच बदलतात, याची खात्री पटते. खरंतर आम्ही सगळेच कोणत्यातरी भीती खाली जगत असतोच. पैसा असणाऱ्यांना तो चोरीला जाईल याची भीती असते तर नसणाऱ्यांना तो आपल्याकडे कसा येईल किंवा दुसऱ्याचा कसा ओरबाडता येईल याच्या चिंतेत ते सतत वावरत असतात किंवा धावत असतात म्हणजेच अनेक प्रकारच्या काळज्या आपल्या पाठीवर घेऊन वावरणारे ससे सर्वत्र पाहायला मिळतातच.

पूर्वीच्या काळी  ‘चिंतातूर जंतू’ नावाची एक कविता अभ्यासात होती. एक छोटासा किडा एका झाडावरती राहत असतो, सकाळी डोळे उघडून पाहतो तेव्हा सूर्याचा लख्ख प्रकाश पडलेला असतो अशा वेळेला एवढ्या सूर्यप्रकाशाचे काय करायचे? याची काळजी त्याला पडते. इतक्मयात त्याला झाडाच्या पानांची सळसळ ऐकायला येते. आणि मग तो मात्र चिडतो एवढी सगळी पाने देवाने कशाला झाडाला दिली. आता ती खाली पडणार की नाही! याची काळजी घेऊनच हा चिंतातूर जंतू जगत असतो. म्हणजे जगात सर्वत्र आपल्याला भित्रा सशांचाच भरणा दिसतो, काही ससे वाघाचे कातडे पांघरतात इतकंच.

Advertisement
Tags :

.