शिवप्रतिष्ठानतर्फे गो-माता पूजन
बेळगाव : वसुबारसनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचालित श्री सिद्धेश्वर गो-शाळा, वाघवडे यांच्यातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून गो-माता दर्शन यात्रा काढण्यात आली. प्रारंभी प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, हिरालाल पटेल, रमेश पटेल, गुजरात भवनचे अध्यक्ष रमेश लद्दड, गोविंद टक्केकर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले.
मारवाडी समाजाच्या महिलांच्या हस्ते गो-माता पूजन करण्यात आले. यानंतर दर्शन यात्रेला प्रारंभ झाला. कपिलेश्वर उड्डाणपुलावरून रामलिंगखिंडमार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे यात्रेची सांगता झाली. याप्रसंगी तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर, अनंत चौगुले, शिवाजी मंडोळकर, कल्लाप्पा पाटील, बाळू गुरव, गजानन निलजकर, परशराम धामणेकर, कल्लाप्पा गोरल, नागेश पाटील, नागराज सावंत, ज्ञानेश्वर सप्ले आदी गो-सेवक, गो-रक्षक व गो-भक्त उपस्थित होते. गो-शाळा संस्थापक अध्यक्ष हिरामणी मुचंडीकर यांनी आभार मानले.