महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिंदोळी येथे घराची भिंत कोसळून गायीचा मृत्यू

10:58 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्यातील शिंदोळी येथे गुरुवारी घराची भिंत कोसळून एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच दोन गायी आणि एक म्हैस जखमी झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घरांची पडझड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गुरुवारी पहाटे शिंदोळी येथील शेतकरी कृष्णा साताप्पा घाडी यांच्या गोठ्यात बांधलेल्या गायीवर घराची भिंत कोसळून गाय जागेवरच दगावली असून दोन गायी आणि एक म्हैस जखमी झाली आहे. याबाबतची माहिती मिळताच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शिंदोळी येथे जाऊन पाहणी केली. तसेच तहसीलदारांना तातडीने पंचनामा करून शेतकऱ्याला मदत करावी, अशी सूचना केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article