For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गळती निवारण्यासाठी सरकारी कार्यालयांवर प्लास्टिक ताडपत्र्यांचे आवरण

06:12 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
गळती निवारण्यासाठी सरकारी कार्यालयांवर  प्लास्टिक ताडपत्र्यांचे आवरण
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

पावसाळा सुरू झाल्याने सरकारी यंत्रणा उपाययोजना राबविण्यासाठी कार्यतत्पर झाली आहे. गळती लागलेल्या सरकारी कार्यालयांच्या छतांची दुरुस्ती करण्यात येत असून काही ठिकाणी छतांवर प्लास्टिक घालून गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या जिल्हा अबकारी उपअधीक्षकांच्या कार्यालयावरील गळती काढण्यासाठी छतावर प्लास्टिक ताडपत्री घालण्याचे काम शनिवारी हाती घेण्यात आले होते.

येथील उपनोंदणी कार्यालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या उपअधीक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर यापूर्वी ताडपत्री घालून गळती निवारण करण्यात आले होते. सध्या ते छत उन्हामुळे बाद झाल्याने त्या ठिकाणी नवीन ताडपत्री घालण्यात येत आहे. उपनोंदणी कार्यालयासह अबकारी उपअधीक्षकांचे कार्यालय आहे. उपनोंदणी कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रे असल्याने गळती निवारण करणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्लास्टिक ताडपत्र्या घालून गळती निवारण केले जात आहे. सदर उपनोंदणी कार्यालय अत्यंत जुने असून इमारतीच्या भिंती मजबूत असल्या तरी छताला गळती लागल्याने तेथे असणाऱ्या कार्यालयांमध्ये गैरसोय झाली होती. त्यामुळे प्लास्टिक छत घालून गळती काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.