For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीलंकेतील पाकिस्तानी मुत्सद्द्याला न्यायालयाचा समन्स

07:00 AM Sep 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
श्रीलंकेतील पाकिस्तानी मुत्सद्द्याला न्यायालयाचा समन्स
Advertisement

चेन्नई : तामिळनाडूच्या चेन्नई येथील एनआयएच्या विशेष न्यायालयाने बनावट चलन प्रकरणी पाकिस्तानी मुत्सद्दी आमिर जुबैर सिद्दीकीला समन्स जारी केला आहे. हे प्रकरण 2018 सालाशी संबंधित आहे. एनआयएने सिद्दीकी आणि अन्य दोन आरोपींच्या विरोधात बनावट चलनाप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. सिद्दीकी सध्या श्रीलंकेत वास्तव्यास असून तो पाकिस्तानी उच्चायोगात सल्लागार (व्हिसा) म्हणून कार्यरत आहे. हे प्रकरण आयपीसीचे कलम 120 ब, 121 अ आणि 489 ब तसेच युएपीएच्या कलम 16 आणि 18 अंतर्गत नोंदविण्यात आले होते. सिद्दीकीला याप्रकरणी फरार मानण्यात आले असून विरोधात अटक वॉरंट जारी आहे. न्यायालयाने आता सिद्दीकीला 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत हजर राहण्याचा निर्देश दिला आहे. भारतातील न्यायालयाने समन्स जारी केल्याने याप्रकरणाची दखल श्रीलंकेच्या सरकारला घ्यावी लागेल. बनावट चलनाचा पुरवठा सिद्दीकीने श्रीलंकेच्या मार्गे भारतात केला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.