महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ईडीविरुद्धच्या गुन्ह्याला न्यायालयाकडून स्थगिती

07:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पश्चिम बंगालमधील प्रकरणात 22 रोजी पुढील सुनावणी

Advertisement

वृत्तसंस्था /कोलकाता

Advertisement

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यातील संघर्ष अनेकदा ठळकपणे चर्चेत असतो. हे प्रकरण टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाकलेले छापे आणि ईडीच्या पथकावर कथित प्राणघातक हल्ल्याशी संबंधित आहे. याप्रकरणी ईडी आणि शाहजहान शेख यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. ताज्या घडामोडीत, कोलकाता उच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने दाखल केलेल्या एफआयआरला स्थगिती दिली आहे. प्रतिवादींना 18 जानेवारीपर्यंत जबाब नोंदवण्याची सूचना करण्यात आली असून पुढील सुनावणी 22 जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एफआयआरवर स्थगिती आदेश दिले आहेत. तसेच प्रतिवादीला येत्या गुऊवारी म्हणजेच 18 जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरच केस डायरी न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणली जाणार असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले. केस डायरी रेकॉर्डवर आणल्यानंतर, गरज पडल्यास, अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) प्रतिज्ञापत्र दाखल करून उत्तर देण्यासही तयार राहावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. खंडपीठाने 22 जानेवारीला पुढील सुनावणी निश्चित केली आहे. कोलकात्याच्या बसीरहाट पोलिसात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये शाहजहान शेखच्या वतीने ईडी अधिकाऱ्यांवर विनयभंग, चोरी आणि मारहाण सारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बशीरहाट पोलिसांनी ईडी अधिकाऱ्यांविऊद्ध भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या कलमांखाली एफआयआर नोंदवला होता. एफआयआरमध्ये टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरातून 1,35,000 ऊपये चोरीला गेल्याचा उल्लेख आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article