महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किरण नायक यांना पुन्हा सेवेत घेण्याची न्यायालयाची सूचना

11:44 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाकडून दिलासा

Advertisement

बेळगाव : गृहरक्षक दलाचे कमांडंट किरण रुद्रा नायक यांच्यावर खोटे आरोप करून मुदत संपण्याआधीच राज्य सरकारने त्यांची सेवा थांबविली होती. सरकारचा हा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड येथील न्यायपीठाने रद्द ठरविला असून त्यांची पुनर्नियुक्ती किंवा त्यांना मुदतवाढ देण्यासंबंधी विचार करण्याची सूचनाही न्यायालयाने सरकारला केली आहे. किरण नायक यांनी 10 नोव्हेंबर 2023 रोजी गृहरक्षक दलाच्या कमांडंट पदाचा राजीनामा दिला होता. 7 डिसेंबर रोजी सरकारने त्यांना पदावरून मुक्तही केले होते. मात्र, लगेच दुसऱ्याच दिवशी एक अधिसूचना जारी करून त्यांच्यावरील आरोपांमुळे त्वरित सेवा थांबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, न्यायालयाने ही कारवाईच रद्द केली आहे.

Advertisement

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवी होसमनी यांनी यासंबंधी आदेश जारी केला आहे. किरण नायक यांनी राज्य सरकार व राज्य पोलीस महासंचालकांवर न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागितला होता. या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर त्यांच्यावरील आरोपांसंबंधी कोणतीच चौकशी न करता त्यांच्यावर केलेली कारवाई रद्द ठरविली आहे. याबरोबरच किरण नायक यांना गृहरक्षक दलाच्या कमांडंट पदावर मुदतवाढ किंवा पुनर्नियुक्ती करण्याची सूचना न्यायालयाने सरकारला केली आहे. न्यायालयाच्या निकालामुळे आपल्यावर खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना चपराक बसली आहे. व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आपण प्रयत्न करीत होतो. त्यामुळे आपल्यावर खोटे आरोप करीत बदनाम करण्यात आले होते, असे किरण नायक यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article