For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महामेळाव्याच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली

12:02 PM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
महामेळाव्याच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली
Advertisement

बेळगाव : सुवर्ण सौधमध्ये कर्नाटक सरकारने अधिवेशन  भरविले होते. त्या अधिवेशनाला विरोध म्हणून म. ए. समितीने महामेळावा आयोजित केला होता. मात्र मेळाव्याला परवानगी घेतली नाही म्हणून म. ए. समितीच्या 29 जणांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी सोमवारी होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीने 2021 मध्ये टिळकवाडी येथील व्हॅक्सीन डेपोजवळ रस्त्यावरच स्टेज घातले म्हणून मनपाच्या मंजुश्री यानी टिळकवाडी पोलिसात म. ए. समितीचे दिपक दळवी, शुभम शेळके, प्रकाश मरगाळे, मदन बामणे, माजी आम. मनोहर किणेकर, शिवाजी सुंठकर, मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, रणजित चव्हाण, प्रकाश शिरोळकर, सचिन केळवेकर, सुनील बोकडे, सरिता पाटील, रेणू किल्लेकर, श्रीकांत कदम, दिलीप बैलूरकर, बापू भंडागे, आर. एम. चौगुले, बाबू कोल्हे, राकेश पलंगे, अनिल अंबरोळी, पियुश हावळ, सुरज कुडचकर, दत्ता उघाडे, मनोहर हलगेकर, मनोहर हुंदरे, सुरज कणबरकर, संतोष मंडलिक, धनंजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होता. या खटल्याची सुनावणी सोमवारी होती. मात्र पुन्हा सुनावणी पुढे ढकलली असून, 16 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. कार्यकर्त्यांच्यावतीने अड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. रिचमॅन रिकी, अॅड. वैभव कुट्रे काम पाहात आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.