महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केजरीवाल जामीनप्रश्नी ईडीला न्यायालयाची नोटीस

07:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात 1 जूनला सुनावणी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला नोटीस बजावली आहे. न्यायालय आता 1 जून रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर गुरुवारी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव जामिनाची मागणी केली आहे. त्यावर न्यायालयाने ईडीला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. केजरीवाल यांनी नियमितता आणि आरोग्याच्या आधारावर 7 दिवसांचा अंतरिम जामीन मागितला आहे. ते सध्या अंतरिम जामिनावर बाहेर असून त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे.

दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 21 मार्च रोजी अटक केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना तुऊंगात पाठवण्यात आले होते. त्यांची अनेक दिवस ईडीच्या कोठडीत चौकशी केल्यानंतर 1 एप्रिल रोजी त्यांची न्यायालयीन कोठडीत तिहार तुऊंगात रवानगी करण्यात आली होती. सुमारे 49 दिवस तुऊंगात असलेल्या केजरीवाल यांना 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी हा जामीन देण्यात आला होता. न्यायालयाने केजरीवाल यांना काही अटींसह 1 जूनपर्यंत जामीन मंजूर करतानाच 2 जून रोजी शरण येण्याचे आदेश दिले होते. आत्मसमर्पणाची तारीख जवळ येण्यापूर्वीच केजरीवाल यांनी एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. केजरीवाल यांनी अंतरिम जामीन एक आठवड्याने वाढवण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. केजरीवाल यांनी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा हवाला दिला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळत अंतरिम जामीन वाढवण्यास नकार दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article