For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामाच्या बदल्यात मिळतात कूपन

06:44 AM Feb 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
कामाच्या बदल्यात मिळतात कूपन
Advertisement

कंपनी देत नाही पगार

Advertisement

चीनच्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने पगाराच्या बदल्यात रक्कम नव्हे तर केवळ कूपन देण्यात येत असल्याचा दावा केला आहे. हे प्रकरण समोर येताच कंपनीवर जोरदार टीका सुरू जाली असून सरकारने चौकशी सुरू केली आहे.

एका शॉपिंग सेंटरने स्वत:च्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या रकमेचे व्हाउचर पगारादाखल दिले आहेत. हे व्हाउचर 116 रुपयांपासून 5800 रुपयांपर्यंतची आहेत. परंतु त्यांची कुठलीच कॅश व्हॅल्यू नाही, म्हणजेच त्यांचा बाजारात पैशांप्रमाणे वापर करता येत नाही. हे प्रकरण चीनच्या लिजिन प्रांतातील मोतियान वाइटालिटी सिटी शॉपिंग सेंटरचे आहे.

Advertisement

प्रत्येक कूपनवर एक युनिक क्रमांक असतो. त्यांचा वापर कंपनीची संपत्ती, पार्किंग स्पेस, रेस्टॉरंट आणि कपड्यांच्या दुकानांमध्ये केला जाऊ शकतो. परंतु जर कुठल्याही सामग्रीची किंमत कूपनपेक्षा कमी असेलतर उर्वरित रक्कमही मिळत नाही.

ज्या कर्मचाऱ्याने हा प्रकार उघडकीस आणला, त्याने सोशल मीडियावर माझ्या तीन महिन्यांच्या कठोर मेहनतीचे मूल्य म्हणजे हे कूपन असल्याचे म्हटले आहे. माझे अनेक सहकारी गृहकर्ज अन् वाहनकर्ज फेडत आहेत, मुले अन् वृद्ध आईवडिलांची देखभाल करत आहेत. या कूपनसोबत आम्ही पूर्णपणे हतबल आहोत असे त्याने नमूद केले आहे.

याप्रकरणी आता सरकारकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच कंपनीच्या विरोधात लवकरच मोठी पावले उचलली जाऊ शकतात. कंपन्या आता स्वत:च्या कर्मचाऱ्यांचे शोषण करण्यासाठी नवनवे मार्ग शोधत असल्याचा आरोप केला जात आहे. यासंबंधीचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

Advertisement
Tags :

.