मुलांसह जंगलात थाटला दांपत्याने संसार
जे लोक मोठ्या शहरात राहतात, त्यांना सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळू शकतात, परंतु हे लोक शहरातील गर्दी, महागाई आणि गोंगाटाने त्रासलेले असतात. अशा स्थितीत ते सर्वकाही सोडून छोट्या शहरांमध्ये जाऊन स्थायिक होऊ इच्छितात. अशाच एका दांपत्याने शहरी जीवन सोडून दिले आणि विदेशातील जंगलांमध्ये स्थायिक होण्याचे पाऊल उचलले आहे.
एप्रिल महिन्यात टेक्सासच्या अमरिलो शहरातील एका परिवाराने स्वत:च्या 5 बेडरुमच्या आलिशान घर आणि बहुतांश सामग्रीला विकून पनामाच्या घनदाट जंगलात नवे जीवन सुरू केले. मकायला आणि ब्रायन ओबरलिन यांनी स्वत:ची तीन अपत्य (14, 12 आणि 10 वर्षे)सोबत दझनभर सूटकेस घेत अमेरिकेला रामराम केला आणि पनामामध्ये नवे घर निर्माण केले. 36 वर्षीय मकायला एक व्यावसायिक आहे आणि तिचा पती माजी सैनिक आहे. दोघांनीही अमरिलो येथे जीवन व्यतित केल्यावर एक वेगळी जीवनशैली अवलंबिण्याचा निर्णय घेतला.
आता माझी मुले बाहेर जाऊ शकतात, अमरिलोमध्ये हे शक्य नव्हते असे मकायलाचे सांगणे आहे. पनामामध्ये आम्हाला अधिक चांगले सामुदायिक वातावरण मिळाले आहे. येथे दर बुधवारी गेम नाइट असते आणि गुरुवारी मुलांचा क्लब, हे सर्व अदभूत आहे. आम्ही आता एका परिवार म्हणून चांगला वेळ घालवत आहोत असे त्यांनी सांगितले.
ब्रायनने 12 वर्षे सैन्यात सेवा बजावली असून त्यांचा परिवार यापूर्वीही फोर्ट ब्लिस आणि फोर्ट हूड यासारख्या ठिकाणी राहिला आहे. याचमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे त्यांच्यासाठी नवे नाहच. अमेरिका आणि पनामातील जीवनात सर्वात मोठा फरक खर्चाचा आहे. अमेरिकेत दर महिन्याला आम्ही 1900 डॉलर्सचे घरभाडे भरत होतो. तर पनामाच्या जंगलात राहण्यासाठी केवळ 1700 रुपये देत आहोत. येथे दैनंदिन गरजेच्या गोष्टीही स्वस्त आहेत. अमेरिकेत दर आठवड्याला आम्ही 300-400 डॉलर्सचे सामान खरेदी करायचो. येथे त्याच खर्चात एक महिन्याची सामग्री मिळते असे मकायलाने सांगितले.
आता हा परिवार स्वत:च्या घराच्या बगीच्यात केळीचे पिक घेत आहे. 2022 साली कोस्टारिका येथील प्रवासानंतर या दांपत्याने विदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी कमी खर्चिक जीवनशैली आणि रोमांचप्रियतेला या निर्णयाचे मुख्य कारण ठरविले. 2024 मध्ये पनामा प्रवासादरम्यान त्यांनी एका आठवड्याचा पूर्ण टूर प्लॅन केला. यादरम्यान त्यांनी विविध शहरांचा दौरा केला. शाळा पाहिल्या, घरांचा शोध घेला आणि ग्रॉसरी स्टोअरचाही अनुभव घेतला होता.
ही आमच्यासाठी एक सामान्य सुटी नव्हती, तर एका संभाव्य जीवनाची तयारी होती. पनामापूर्वी आम्ही थायलंड, मलेशिया, इक्वेडोर आणि कोस्टा रिका यासारख्या देशांचाही विचार करत होतो असे मकायलाने सांगितले आहे. अमेरिकेतील प्रत्येकी 5 पैकी एक नागरिक पुढील 5 वर्षांमध्ये विदेशात स्थायिक होण्याची इच्छा बाळगून आहे