कंटेनरमध्ये राहतेय जोडपं
खर्च कमी करण्याचा ध्यास
जगात चांगल्या राहणीमानासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात. तर काही लोक चांगल्या राहणीमानासाठी व्याकुळ होत असतात. परंतु एक महिलेने पतीसोबत स्वत:च्या अनोख्या लाइफस्टाइलसाब्sात कंटेनरमध्ये जगण्यास सुरुवात केली आहे. ती स्वत:चे खर्च कमी करण्यासाठी देखील अशाप्रकारची कामे करते, ज्याचा कुणी शहरी माणूस विचारही करू शकणार नाही. स्कॉटिश महिला रॉबिन स्वानची लाइफस्टाइल प्रत्येकाला चकित करत आहे.
33 वर्षीय स्वानने स्वत:चा खर्च कमी करण्यासाठी अत्यंत अनोख्या पद्धती स्वीकारल्या आहेत. ती घरभाडे वाचविण्यासाठी एका शिपिंग कंटेनरमध्ये राहते. दोन वर्षांपूर्वी तिने आत्मनिर्भर जीवनशैली अंगिकारण्याचा निर्णय घेतला आणि याकरता ती आता शेती करत आहे. मांसासाठी प्राणी पाळत असून स्वत:च्या वापरासाठी पावसाच्या पाण्याची साठवणूक करत आहे.
आधुनिक जीवनशैलीचा त्याग
2023 मध्ये तिने स्वत:चे घर सोडले, ज्यात टीव्ही, फ्रीज, कार इत्यादी सर्वकाही विकून स्टर्लिंगनजीक 7 एकर जमीन खरेदी केली, ज्याची किंमत 2 कोटी 9 लाख रुपये होती. यानंतर तिने 4 लाख 70 हजार रुपयांमध्ये शिपिंग कंटेनर खरेदी केला, ज्यात ती 29 वर्षीय जोडीदार ल्युकसोबत राहत आहे.
अनेक तडजोडी
हळूहळू आवश्यक सामग्री जमवित तिने स्वत:च्या स्वप्नांची जीवनशैली अंगिकारण्यास सुरुवात केली आहे. दोघेही कंटेनरमध्ये घराच्या सर्व गरजा पूर्ण करत आहेत. सौर पॅनेल बसवून वीजेचा खर्च तिने दूर केला. पावसाचे पाणी जमा करण्यास सुरुवात केली, यासाठी हार्वेस्टिंग आणि फिल्टरिंग सिस्टीम बसविली. पॉलिथीन टनलमध्ये भाज्या उगविल्या. अंड्यांसाठी कोंबड्या पाळल्या आणि मांसासाठी ससे अन् डुक्करही पाळले आहेत. काही दिवसांमध्ये ती अंडी अन् मांस बाजारात विकू लागेल.
खर्च होत आहेत कमी
परंतु याचा अर्थ स्वान आणि ल्युक यांना खर्चच येत नाही असा नाही. त्यांना फोन बिलसोबत पाणी, भोजनाकरता अजून सुमारे 29 हजार रुपये महिन्याला खर्च करावे लागतात. स्टर्लिंगच्या दृष्टीकोनातून हा खर्च खूपच कमी आहे. अद्याप 40 टक्क्यांपर्यंत आत्मनिर्भर जीवन जगू लागलो आहोत आणि काही दिवसांमध्ये हे प्रमाण 70 टक्क्यांपर्यंत पोहोचेल असे त्यांचे मानणे आहे.