महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

माथेरान येथे गेलेल्या राजापुरातील दाम्पत्याचे मृतदेह आढळले दरीत

04:52 PM Jul 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
Matheran were found in the valley
Advertisement

घटना उलगडा अद्याप नाही

राजापूर वार्ताहर

दर्शनासाठी गेलेल्या राजापुरातील दाम्पत्याचे माथेरान येथे दरीत मृतदेह आढळून आले आहेत. पार्थ काशिनाथ भोगटे (46) आणि त्यांची पत्नी श्रीलक्ष्मी पार्थ भोगटे (46) अशी मृतांची नावे आहेत. हे दाम्पत्य 11 जुलै रोजी माथेरानला फिरायला गेले होते. दरम्यान ही दोघं पती-पत्नी दरीत कसे पडले, या बाबत अद्यापही उलगडा झालेला नाही.

Advertisement

राजापूर शहरातील पतिष्ठीत व्यापारी काशिनाथ भोगटे यांचा मोठा मुलगा पार्थ भोगटे आणि त्यांची पत्नी श्रीलक्ष्मी हे दोघे गुरूवार 11 जुलै रोजी माथेरान येथे फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी दर्शनासाठी जात असल्याचे सांगून हे जोडपे हॉटेल ब्राईट लँडमधून निघाले होते. मात्र दुसऱया दिवशी हे जोडपे परतले नसल्याचे हॉटेल अधिकाऱयांच्या लक्षात आले आणि त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने पोलिसांना या बाबत माहिती दिली.

Advertisement

त्यानंतर स्थानिक पोलिसांनी या जोडप्याचे फोटो व्हॉट्सअŸप ग्रुपवर प्रसारित केले आणि कोणी या जोडप्याला शोधत असेल तर त्यांना कळवा, असे आवाहन केले. दरम्यान पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे जोडपे शेवटचे इको पॉईंटकडे जाताना दिसले आणि या जोडप्याचे शेवटचे लोकेशनही दरीजवळ सापडले. त्यानंतर माथेरानच्या सह्याद्री रेस्क्यू टीमने या दाम्पत्याचा खोऱयात शोध घेण्याचा पयत्न केला. दरम्यान 14 जुलै रोजी पार्थचा लहान भाऊ रुद्राक्ष काशिनाथ भोगटे (43) याने माथेरान गाठून माथेरान पोलिसात ते हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर सोमवार 15 रोजी बचाव पथकाला अखेर या जोडप्याचे मृतदेह लुईसा पॉइंट येथील दरीत सापडल्याची माहिती समोर आली आहे. या दुदैवी घटनेमुळे राजापूर शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :
found in the valleyMatheranRajapur
Next Article