घर भाड्यासाठी दाम्पत्यासह तिघांना मारहाण
मिरज :
शहरातील मालगांव रस्त्यावरील एका घराचे २९ हजार रुपये भाडे येण्याचा गैरसमज करुन पाच जणांनी संगनमत करत एका दाम्पत्यासह त्यांच्या मुलीला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली.
याप्रकरणी प्रकाश शत्रुघ्न सोनवणे (वय ५२) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पाच जणांवर मारहाणीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवनघर शेडबाळे, आशिष शेडबाळे, अजय शेडबाळे, प्रिया शेडबाळे व जीवनधर यांची सून (सर्व रा. मालगांव) अशा पाच जणांवर गुन्हा आहे.
दाखल झाला संबंधीतांनी सोनवणे व त्यांची पत्नी व मुलगीला मारहाण करुन घरासमोर असलेल्या वाहनांचीही तोडफोड केली असल्याची तक्रार सोनवणे यांनी पोलिसात दिली आहे. प्रकाश सोनवणे हे कुटुंबियांसह रस्त्यावरील मालगांव कलावती मंदिराजवळ असलेल्या घरात होते. यावेळी संशयीत वरील पाचजण संगनमत करुन घराजवळ आले. घराचे २९ हजार रुपये भाडे येणेबाकी असल्याचा गैरसमज करुन घेऊन त्यांनी सोनवणे दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली.
तसेच घरासमोरील वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. याबाबत सोनवणे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली असून, पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा करीत आहेत.