कपड्यांचे डोंगर असलेला देश
येथे फेकले जातात प्रख्यात ब्रँडच कित्येक टन कपडे
तुम्ही आतापर्यंत कपड्यांचा बाजार ऐकला असाल, परंतु कपड्यांचे वाळवंट तुम्ही ऐकले नसेल. दक्षिण अमेरिकन देश चिलीमध्ये अटाकामा वाळवंट सध्या चर्चेत आले आहे. येथे कपड्यांचे विशाल डोंगर तयार झाले असून ते आता अंतराळातूनही दिसून येतात.
चिली सेकंड हँड कपडे खरेदी करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येथे दरवर्षी 60 हजार टनापेक्षा अधिक वजनाचे कपडे आयात केले जातात. यातील सुमारे 21 हजार टन कपडे अमेरिका, युरोप आणि आशियातून आणून विकले जातात. विकता न येऊ शकणारे तसेच वापरण्यायोग्य नसलेले कपडे येथे फेकण्यात येतात. या कपड्यांच्या ढिगात ‘जारा’, ‘एचअँडएम’, ‘एडिडास’, ‘प्राडा’ यासारखे अनेक लक्झरी ब्रँड्स असतात.
वाळवंटात कपड्यांचे डोंगर निर्माण होण्याचे महत्त्वाचे कारण फास्ट फॅशन आहे. यामुळे पृथ्वीवरील सर्वात कोरडे ठिकाण आता कपड्यांचे सर्वात मोठे अवैध डंम्पिग ग्राउंड ठरले आहे. लोक लेटेस्ट फॅशन ट्रेंडनुसार कपडे घालतात आणि जुने कपडे फेकून देतात. हेच कपडे आयात होऊन चिलीमध्ये पोहोचतात. परंतु कपड्यांच्या या वाळवंटाचा प्रभाव पर्यावरणावरही पडत आहे. येथे डम्प करण्यात आलेले बहुतांश कपडे प्लास्टिक मिक्स किंवा पॉलिस्टरचे असतात, त्यांचे विघटन होण्यास दोनशे वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.
कपड्यांच्या ढिगावर रॅम्पवॉक
सरकार लोकांना फास्ट फॅशनमागे धावल्याने पर्यावरणाला होणाऱ्या नुकसानापासून वाचविण्यासाठी जागरुकता मोहीम चालवत आहे. काही काळापूर्वी या उष्ण आणि कोरड्या वाळवंटात फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यात मॉडेल्ससाठी फेकण्यात आलेल्या कपड्यांच्या ढिगावर रॅम्प तयार करण्यात आला होता. अटाकामा फॅशन वीकने जगभराचे लक्ष वेधून घेतले होते.