For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देश 2026 पर्यंत नक्षलमुक्त होईल!

06:28 AM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
देश 2026 पर्यंत नक्षलमुक्त होईल
Advertisement

नक्षलवादविरोधी लढा अंतिम टप्प्यात : गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी नक्षलग्रस्त राज्यांमधील सुरक्षा आणि विकासाचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत सर्व राज्यांमधील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर गृहमंत्र्यांनी नक्षलवादविरोधी लढा अंतिम टप्प्यात असून मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचा नायनाट केला जाईल, असे प्रतिपादन केले.

Advertisement

विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचा असेल तर नक्षलवाद संपवावा लागेल, असे ते म्हणाले. देशविरोधी संघटनांशी लढण्यासाठी नक्षलग्रस्त भागात कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. 30 वर्षात पहिल्यांदाच डाव्या अतिरेक्मयांमुळे मारल्या गेलेल्या लोकांची संख्या 100 पेक्षा कमी झाली असल्याचेही गृहमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. सद्यस्थितीत 85 टक्के पॅडर्स छत्तीसगडपुरते मर्यादित आहेत. छत्तीसगडमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत 194 जण मारले गेले. तर 801 जणांनी शस्त्र सोडले आणि 742 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पुन्हा एकदा नक्षलवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे आणि विशेषत्त्वाने नक्षलवादविरोधी मोहीमेत भाग घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.

2024 मध्ये आतापर्यंत सशस्त्र नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना अभूतपूर्व यश मिळाले आहे. आम्ही राज्यांमध्ये राज्य पोलीस आणि संयुक्त कार्यदल स्थापन केले आहे, परंतु आम्हाला त्याच्या श्रेणीबद्धतेवर देखील काम करावे लागेल. सध्या नक्षलवाद्यांविरोधात लढणाऱ्या बीएसएफ आणि हवाई दलाच्या जवानांना वाचवण्यासाठी 12 हेलिकॉप्टर तैनात असल्याचेही शहा यांनी नमूद केले. विकासापासून वंचित असलेल्या भागात योजना पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने रस्ते आणि मोबाईल कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासह अनेक पावले उचलली आहेत. नक्षलवाद प्रभावित भागात आतापर्यंत 14,400 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले असून सुमारे 6000 मोबाईल टॉवर लावण्यात आले आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वी 6 ऑक्टोबर 2023 रोजी नक्षलवाद प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत गृहमंत्र्यांनी नक्षलवाद संपवण्याबाबत मोठ्या प्रमाणात मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. मोदी सरकारच्या रणनीतीमुळे 2010 च्या तुलनेत 2023 मध्ये नक्षलवादाच्या हिंसाचारात 72 टक्के घट झाली होती, तर मृत्यूमध्ये 86 टक्के घट झाल्याचे सांगण्यात आले आहे. नक्षलवाद आज शेवटची लढाई लढत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.