For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘धनकुबेरा’च्या तिजोरीतील नोटा मोजून संपेनात

06:50 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘धनकुबेरा’च्या तिजोरीतील नोटा मोजून संपेनात
Advertisement

300 कोटींहून अधिक जप्त : चार दिवसांपासून अजूनही मोजदाद सुरूच : आतापर्यंतची ‘सर्वाधिक’ रोख रक्कम

Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरात 300 कोटींहून अधिक रोकड सापडली आहे. देशातील कोणत्याही एजन्सीने एकाच गट आणि त्याच्याशी संबंधित संस्थांविऊद्ध केलेल्या कारवाईत जप्त केलेली ही सर्वाधिक रोख रक्कम आहे. ओडिशा आणि झारखंडमधील त्यांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. या छाप्यात प्राप्तिकर अधिकाऱ्यांना तिजोरीत कोट्यावधी ऊपयांचा मुद्देमाल सापडला. छापेमारीचा एक व्हिडीओही समोर आला असून त्यामध्ये प्रचंड रोख रक्कम दिसत आहे. ही रक्कम बहुतांश ‘काळा पैसा’ स्वरुपातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisement

बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांविऊद्ध छापे टाकल्यानंतर 6 डिसेंबरपासून सुरू झालेल्या कारवाईनंतर प्राप्तिकर विभागाने नोटा मोजण्यासाठी सुमारे 100 हून अधिक मशीन तैनात केल्या आहेत. मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेचे कर्मचारी आणले आहेत. मात्र, ही रक्कम अजूनही मोजून संपली नसल्याचे समजते. शनिवारपर्यंत ही रक्कम तीनशे कोटींपर्यंत पोहोचली होती. याशिवाय जप्त केलेली रोकड राज्य सरकारी बँकांमध्ये पोहोचवण्यासाठी विभागाने आणखी वाहनांची मागणी केली आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून धीरज प्रसाद साहू यांच्या अन्य मालमत्तांवरही छापे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच आता प्राप्तिकर अधिकारी कंपनीचे विविध अधिकारी आणि त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींचे जबाब नोंदवत आहेत.

प्राप्तिकर अधिकाऱ्यांना दारू वितरक, विव्रेते आणि व्यावसायिक गटांद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध विक्री आणि रोख रकमेची वाहतूक याविषयी ‘गुप्तचर’कडून माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या छाप्यात बोलंगीर जिह्यातील कंपनीच्या आवारात ठेवलेल्या सुमारे 8-10 शेल्फमधून 230 कोटी ऊपये रोख जप्त करण्यात आले, तर उर्वरित रक्कम टिटलागढ, संबलपूर आणि रांचीमधून जप्त करण्यात आली.

भाजप नेत्यांकडून काँग्रेस लक्ष्य

काँग्रेस नेत्याकडे सापडलेल्या या कोट्यावधींच्या घबाडानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केंद्रातील आणि राज्यातील भाजप नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले असतानाच काँग्रेस श्रेष्ठींपैकी कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने भाष्य केलेले नाही. काही काँग्रेस नेते याबाबत बोलत असले तरी त्यांनी साहू यांनाच यासंबंधी विचारावे लागेल असे म्हटले आहे. तर काही जणांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या उद्योगपतीकडे आपला पैसा लपवून ठेवल्याचा दावा केला आहे. याआधी शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स-पोस्टवर हास्यास्पद इमोजी पोस्ट करत ‘देशवासीयांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहावे आणि मग त्यांच्या नेत्यांची प्रामाणिक भाषणे ऐकावीत. जनतेकडून लुटलेला एक-एक पैसा परत करावा लागेल, ही मोदींची हमी आहे, असे ट्विट केले होते.

‘यापूर्वी फक्त बँकेच्या पॅशियरनेच इतक्मया नोटा पाहिल्या असतील’ : अमित शाह

आज जागतिक भ्रष्टाचारविरोधी दिन आहे. सुदैवाने दोनच दिवसांपूर्वी आम्ही अशी छायाचित्रे पाहिली होती ज्यात एका खासदाराच्या घरात इतकी रोकड सापडली होती. हे पाहून मला आश्चर्य वाटले. आतापर्यंत फक्त बँक पॅशियरने इतक्मया नोटा पाहिल्या असतील. अन्य कुणीही आयुष्यात इतक्मया नोटा एकत्र पाहिल्या नसतील अशी मला खात्री आहे’, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर निशाणा

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत ‘एक्स’वर कमेंट पोस्ट केली आहे. ‘भ्रष्टाचार आणि काँग्रेस या दोन खऱ्या बहिणी आहेत. जिथे एक जाते तिथे दुसरी आपोआप जाते. काँग्रेस नेत्यांच्या घरांवर छापे टाकून कोट्यावधी ऊपयांची रोकड जप्त केली जात आहे. नोटा मोजणी करताना मशीन्स गरम झाल्या. 32 बँक अधिकारीही कमी पडले, पण नोटांचे गठ्ठे गायब झाले नाहीत. एवढा पैसा काँग्रेसच्या भ्रष्ट खासदाराकडून सापडला. काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे’, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.