महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यातील 288 मतदार संघात आज मतमोजणी

06:52 AM Nov 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोण जिंकणार, कोण हरणार? उच्चुकता शिगेला : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Advertisement

मुंबई / प्रतिनिधी

Advertisement

मागील पाच वर्षांत राज्यात जे राजकारण झाले त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. त्यात राज्याचे हित काय साधले आणि नुकसान किती झाले याचे प्रतिबिंब बुधवार 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात नक्कीच उमटले असणार. या राजकारणात भाग घेतलेल्या प्रमुख व्यक्ती पुन्हा निवडणुकीला उभ्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये आता कोण हरणार, कोण जिंकणार, कोण विजयाचा गुलाल उधळणार हे संपूर्ण चित्र आज स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेत आपल्याला वाचारले जात नाही,  महत्त्वाच्या गोष्टीत डावलले जाते म्हणून एकनाथ शिंदे यांनी बंड घडवून आणत ते चाळीस आमदारांसह बाहेर पडले नसते आणि शिवसेनेत दुभंग झाला नसता. तसेच मी परत येईन, मी परत येईन असे म्हणणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2019 मध्ये जास्त आमदार असतानाही उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याने पुन्हा युतीचे मुख्यमंत्री म्हणून निराजमान होऊ शकले नाही.  मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना  बहाल केले. पण उद्धव ठाकरे यांना धडा शिकविला आणि 2019 च्या घटनेचा बदला घेतला यातच त्यांना समाधान लाभले.

मुख्यमंत्रीपदापासून सुऊवात केली तर ठाण्यात एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. ठाणे जिल्हा त्यांचा बालेकिल्ला आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी शिवसेनेत बंड घडवून आणले. त्यामुळे  एकनाथ शिंदे यांच्या नेतफत्वाखालील सरकारने अनेक चांगली कामे केली. पण पन्नास खोके, एकदम ओके, ही त्यांची ठाकरे गटाची घोषणा, गद्दार म्हणून हिणवणे याचा मतदारांवर किती परिणाम झाला आणि त्यांचे प्रतिबिंब मतदानात कसे उमटले ते आज स्पष्ट  होणार आहे.

मागील पाच वर्षातील राज्याचे राजकारण पाहिले तर गफहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस प्रशासनावर पकड ठेवण्यासाठी तसा वेळ कमीच पडला असावा. मुंबईसह राज्यात दंगली झाल्या नाहीत. पण जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलकांवर जालन्यात झालेला लाठीमार आणि त्यांचे राज्यभर झालेले परिणाम यामुळे मराठा समाज फडणवीसांविरोधात राहिला आहे. तसेच मुंबईसह राज्याच्या काही भागात महिला, बालिकांवर अत्याचाराचे प्रसंगही झाले. त्याचे पडसाद मतदानातून उमटण्याची शक्यता आहे.

बारामतीत नाही नाही म्हणता म्हणता अजित पवार अखेर बारामतीतूनच उभे राहिले.त्यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार उभा होता. लोकसभा निवडणुकीत नणंद-भावजयीच्या लढ्यात नणंद सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. तसेच राजकारणात काका शरद पवार यांना पुतण्या अजित पवार यांनी शह दिला. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीची मालकी अजित पवार यांच्याकडे गेली. विधानसभा निवडणुकीत काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र पवार यांच्या लढाईत नक्की काय होईल याकडे स़ाऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

ठाण्यात आघाडी आणि महायुतीत वर्चस्वाची लढाई

ठाणे जिह्यात 18 विधानसभा मतदार संघ येत आहेत,आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,गणेश नाईक ,मंदा म्हात्रे,जितेंद्र आव्हाड,रवींद्र चव्हाण, प्रताप सरनाईक संजय केळकर,राजन विचारे, मंदा म्हात्रे,किसन कथोरे,मनसेचे अविनाश जाधव ,राजू पाटील,गिता जैन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शिवसेना -भाजपात लढाई

ठाण्यातील 18 जागांपैकी 8 जागेवर भाजपचे तर शिवसेना शिंदे गटाचे 5 तर सपा, मनसे, अपक्ष प्रत्येकी एक आणि राष्ट्रवादीचे दोन असे 18 आमदारांचे बलाबल आहे.मुख्यमंत्री ठाण्याचे असल्याने ठाण्यात यावेळी शिवसेना आणि भाजपात सुप्त संघर्ष पहिल्या दिवसापासुन पहायला मिळाला,त्यात बंडखोरांनी निशाण फडकवल्याने ठाण्यातील 18 जागांवर कोण वर्चस्व मिळवणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article