नगरसेवक नितीन जाधव यांच्याकडून कचरा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई
11:18 AM Nov 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : नागरिकांकडून रस्त्यावर कचरा टाकण्याचे सत्र सुरूच असल्याने वॉर्ड क्र. 29 चे नगरसेवक नितीन जाधव यांनी आपल्या वॉर्डात स्वच्छता मोहीम राबविली आहे. नागरिकांकडून या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून जनजागृती केली जात आहे. घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांना दंड ठोठावण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. स्वच्छ शहर उपक्रमाला चालना देण्यासाठी नागरिकांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, कचरा संकलनासाठी येणाऱ्या वाहनाकडेच कचरा जमा करावा व नगरपालिकेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नगरसेवक जाधव यांनी केले. तसेच परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी ही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Advertisement
Advertisement