For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

महानगरपालिकेची आजपासून करवसुली

11:55 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
महानगरपालिकेची आजपासून करवसुली

सर्व्हर समस्या झाली दूर : उद्दिष्ट गाठण्यासाठी करावी लागणार धडपड

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेतील घरपट्टी तसेच इतर करवसुली थांबली होती. निवडणुकीच्या कामाबरोबरच सर्व्हरची समस्या निर्माण झाल्याने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच महानगरपालिकेला करवसुली थांबवावी लागली. मात्र आता विशेष कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबरोबरच सर्व्हरची समस्या सुटणार असून गुरुवारपासून घरपट्टी तसेच कर भरून घेतला जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेतर्फे देण्यात आली. महानगरपालिकेला 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये दिलेले करवसुलीचे उद्दिष्ट  पूर्ण करता आले नाही. यावर्षी तर मागील वर्षापेक्षाही अधिक उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे आतापासूनच या कामाला लागणे गरजेचे आहे. मात्र पहिलेच तीन दिवस करवसुलीविना गेले आहेत. मात्र आता सर्व्हरची समस्या सुटली आहे. याचबरोबर काही कर्मचाऱ्यांचीही करवसुलीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ही समस्या सुटणार आहे. महानगरपालिकेला 2024-25 या आर्थिक सालासाठी 73 कोटी 50 लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या महसूल विभागाला कंबर कसावी लागणार आहे. यावर्षीच उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. त्यातच अधिक 10 कोटींचे उद्दिष्ट महानगरपालिकेसमोर ठेवल्यामुळे महसूल विभागासमोर आता या कामासाठी धडपड करावी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर्षी लोकसभा निवडणूक 7 मे रोजी होत आहे. त्या कामासाठी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आले आहे. परिणामी करवसूल करताना अडचण येत आहे.

एप्रिलमध्ये 5 टक्के सवलत

Advertisement

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर कर वसुलीला गती येणार आहे. ऑनलाईनद्वारे करवसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक कर वसुली करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये जर कर भरला तर 5 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या करवसुलीला निश्चितच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असे सांगण्यात आले.

Advertisement

उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 7 कोटी पडले कमी : मार्च महिन्यात 2 कोटी 36 लाख 61 हजार 400 रुपये कर जमा

महानगरपालिकेला करवसूल करण्याबाबत उद्दिष्ट दिले जाते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले जाते. मात्र यावर्षी उद्दिष्ट पूर्ण होण्यास 7 कोटी 41 लाख 97 हजार 539 रुपये कमी पडले आहेत. त्यामुळे यावर्षी उद्दिष्ट पूर्ण झाले नाही तर पुढील वर्षासाठी तब्बल 73 कोटी 50 लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले गेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आतापासूनच हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. महानगरपालिकेला 2023 एप्रिल ते मार्च 2024 पर्यंत 62 कोटी रुपये कर जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 54 कोटी 58 लाख 2 हजार 461 रुपये जमा झाले आहेत. मार्च 2024 या अखेरच्या महिन्यात 2 कोटी 36 लाख 61 हजार 400 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. यावर्षी पुन्हा महानगरपालिकेचे कर्मचारी कर जमा करण्यासाठी कामाला लागले आहेत. मात्र सध्या लोकसभा निवडणुकीच्या कामामध्ये हे कर्मचारी गुंतले आहेत. एप्रिल महिन्यामध्ये आस्थापनधारकांनी कर भरला तर 5 टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे काही आस्थापनधारक स्वत:हूनच कर भरण्याची शक्यता आहे. यावर्षी अधिक उद्दिष्ट दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. आस्थापनाचा कर, तसेच उद्योग-व्यावसायिकांचा कर जमा करण्यासाठी मोहीम राबविली जाणार आहे. मात्र निवडणुकीनंतर त्या मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे.

Advertisement
Tags :
×

.