महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोरोना लस बाधक नव्हे, तर लाभदायक

06:31 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयसीएमआरच्या महत्त्वपूर्ण संशोधनाचा निष्कर्ष : अहवाल प्रसिद्ध 

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

तरुणांना किंवा प्रौढांना अचानक येणारा हृदयविकाराचा झटका कोरोना लस घेतल्याने येत नसून उलट या लसीमुळे संभाव्य हृदयविकार टळण्यास साहाय्यता मिळते, असे वक्तव्य भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाने (आयसीएमआर) केले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये देशात अचानक येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढले आहे. असे झटके कोरोना लस घेतल्यामुळे येत आहेत, असा समज पसरविण्यात आला आहे. त्यामुळे मंडळाने यासंबंधीचे व्यापक संशोधन केले असून त्याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अहवालात कोरोना लस गुणकारी आणि सुरक्षित असल्याचे प्रतिपादन व्यापक सर्वेक्षणानंतर करण्यात आले आहे.

हे देशव्यापी संशोधन 1 ऑक्टोबर 2021 ते 13 मार्च 2023 या 17 महिन्यांच्या प्रदीर्घ काळात करण्यात आले. ते देशातील 47 मोठ्या रुग्णालयांमध्ये करण्यात आले. 18 वर्षे ते 45 वर्षे या वयोगटातील लस घेतलेल्या रुग्णांचे या संशोधनात व्यापक परीक्षण करण्यात आले. कोणताही ज्ञात आजार किंवा विकार नसतानाही या रुग्णांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. असे 729 रुग्ण आणि 2,916 नियंत्रक व्यवस्थांचा समावेश या संशोधनात होता. ज्या व्यक्तींनी कोरोना लसींच्या दोन मात्रा (डोसेस) घेतल्या आहेत, त्यांना अचानक येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याचा धोका बऱ्याच कमी प्रमाणात होतो, असे या संशोधनात आढळून आले आहे. ज्यांनी लसीची एकच मात्रा घेतली आहे, त्यांच्यावरही सकारात्मक परिणाम होतो. पण तो दोन मात्रा घेतलेल्यांपेक्षा कमी प्रमाणात आहे, असेही या संशोधनात आढळून आले आहे. त्यामुळे अचानक येणारे हृदयविकाराचे झटके कोरोना लसीमुळे येत नाहीत. त्यासाठी अन्य कारणे असू शकतात, असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.

कारणे कोणती आहेत ?

मंडळाने अकस्मात येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यांच्या कारणांचेही व्यापक संशोधन केले आहे. कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागणे, पण कोरोनाची लस घेतलेली नसणे, अचानक हृदयविकाराच्या झटक्यांचा कौटुंबिक इतिहास, अतिमद्यपानाची सवय, अशा अचानक मृत्यूपूर्वी 48 तास अगोदरपर्यंत मोठ्या प्रमाणात मद्यपान केलेले असणे, उत्साहवर्धन अनधिकृत औषधांचे सेवन, अमली पदार्थांचे सेवन, शरीराला न झेपणारा अतिव्यायाम करणे आदी कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत, असेही संशोधन अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांनी जपून रहावे

ज्या व्यक्तींना पूर्वी तीव्र स्वरुपाचा कोरोना होऊन गेलेला आहे, त्यांच्या हृदयाचे स्नायू दुर्बल झाले असण्याची शक्यता असते. हा लसीचा परिणाम नव्हे, तर कोरोनाच्या विषाणूंचा परिणाम असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन ते चार वर्षे अवजड आणि अवघड व्यायाम करु नये. तसेच कोरोनाचा प्रभाव नाहीसा होईपर्यंत हृदयावर ताण येईल, असा शारीरिक व्यायाम टाळावा. ज्यांनी कोरोनाच्या लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या आहेत त्यांच्या हृदयाची स्थिती लस न घेतलेल्यांच्या पण कोरोना झालेल्यांच्या हृदयापेक्षा चांगली असते. त्यामुळे लस गुणकारी आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

कारणांवर महत्त्वपूर्ण प्रकाश

अचानक हृदयविकाराचा झटका कोणत्या कारणांमुळे येतो, यावर या संशोधनात मोठाच प्रकाश टाकण्यात आल्याने ते अतिशय महत्त्वाचे ठरते, असे मत अनेक वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच हा संशोधनाचा अहवाल अचानक हृदयविकाराचा झटका आणि कोरोनाची लस घेतलेलाr असणे, यांच्यातील संबंधही पूर्णत: आणि स्पष्टपणे फेटाळत आहे. असे अचानक झटके कोरोना लसीमुळे नव्हे, तर अन्य कारणांमुळे तसेच व्यसनाधीनता आणि चुकीची जीवनशैली यांच्यामुळे येतात, असे यात पुराव्यांनिशी दाखवून देण्यात आले आहे. त्यामुळे हा अहवाल मार्गदर्शक आणि गैरसमज निवारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

संशोधनाचे निष्कर्ष

ड अचानक हृदयविकाराचा झटका कोरोना लसीमुळे येत नाही

ड उलट, कोरोना लस घेतलेल्यांना असा धोका कमी प्रमाणात

ड अचानक हृदयविकार झटक्यासाठी अन्य कारणेच उत्तरदायी

ड अतिमद्यपानाची सवय, फॅमिली हिस्ट्री, ताणतणाव ही कारणे

ड शरीराला न झेपणारा अतिव्यायामही यासाठी आहे कारणीभूत

ड कोरोना लस आणि अचानक हृदयविकार यांचा संबंध नाही

ड हृदयाचे दौर्बल्य तीव्र कोरोनामुळे, त्यावरील लसींमुळे नाही

ड कोरोना होऊन गेलेल्या पण लस न घेतलेल्यांनी दक्षता घ्यावी

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article