महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॉर्निंग भारतात बनवणार गोरीला ग्लासची निर्मिती

07:00 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चेन्नई : अनेक स्मार्टफोन्स हे गोरीला ग्लाससह बाजारात उपलब्ध असलेले आपण पाहिलेले आहेत. कॉर्निंग ही कंपनी गोरीला ग्लासची निर्मिती करते, जी भारतात उत्पादन कारखाना सुरु करण्याचा विचार करते आहे. तामिळनाडूत कांचीपुरम येथे अॅपलची पुरवठादार कंपनी कारखाना सुरु करणार असून यासाठी 1003 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. याअंतर्गत कंपनी आगामी काळात 840 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार आहे. कंपनी हे काम ऑप्टीमस इंफ्राकॉम, भारत इनोव्हेटीव्ह ग्लास टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यासंदर्भात कंपनीने तामिळनाडू सरकारसोबत सहकार्याचा करार केला आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये याबाबतीत कंपनीने स्पष्टीकरण दिले होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article