For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहकारामुळे तळागाळातील माणूस सक्षम

10:42 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
सहकारामुळे तळागाळातील माणूस सक्षम
Advertisement

सोमनाथ पाटील यांची मराठा बँकेला सदिच्छा भेट

Advertisement

बेळगाव : सहकारातून समृद्धीकडे हा सहकाराचा मंत्र आहे. मराठा बँकेने सहकाराच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील माणसाला सक्षम करण्याच्या उद्देशाने सातत्याने काम करून लौकीक मिळविला आहे. सध्या स्पर्धात्मक बँकिंग आहे. यामध्ये दररोज वेगवेगळे बदल होत आहेत. या बदलांचा वेळोवेळी अंगीकार करून बँकेने चालविलेली वाटचाल कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार दुबई सरकारचे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सोमनाथ उर्फ बबन जायाप्पा पाटील यांनी मराठा बँकेला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी काढले. यावेळी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पाटील होते.

यावेळी बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक करून बँकेची माहिती दिली. बहुजन समाजाचे हित लक्षात घेऊन बँकेने यशस्वी वाटचाल चालविली असल्याचे सांगितले. यावेळी सचिन ईटकर म्हणाले, सहकारामुळे सर्वसामान्यांना पत निर्माण होण्यास मदत होत आहे. सहकार हा विश्वासावर निगडीत आहे. तळागाळात जाऊन सर्वसामान्यांना सहकाराच्या माध्यमातूनच मदत झाली आहे. सहकाराला उज्ज्वल भविष्य आहे, असे त्यांनी  सांगितले. यावेळी व्हाईस चेअरमन निना कातकर, संचालक बाळाराम पाटील, बी. एस. पाटील, एस. एस. खोकाटे, शेखर हंडे, सुनील अष्टेकर, विनोद हंगीरकर, रेणू किल्लेकर, जनरल मॅनेजर संतोष धामणेकर, नारायण किटवाडकर, शिवाजीराव हंगीरकर, राजाराम हंगीरकर, विनायकराव कंग्राळकर, अशोक कांबळे, प्रकाश बेळगुंदकर आदी उपस्थित होते. निना काकतकर यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.