बेळगावात आज कूच बिहार करंडक सामना
बेळगाव : बेळगाव येथे बीसीसीआय व कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कूच बिहार चषक 19 वर्षाखालील उपांत्य फेरीचा सामना कर्नाटक व तामिळनाडू यांच्यात केएससीए मैदानावर 5 ते 8 जानेवारी दरम्यान खेळविण्यात येणार आहे. सामन्याची संपूर्ण तयारी झाली असून दोन्ही संघांनी जोमाने सराव केला. कूच बिहार उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी बेळगावची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. गुरुवारी दोन्ही संघांनी सकाळच्या सत्रात कसून सराव केला.
कर्नाटक संघ : कर्णधार धीरज गौडा, उपकर्णधार हार्दिक राज, प्रखर चतुर्वेदी, क्रिशेव बजाज, कार्तिकेय के. पी., सुमित द्रविड, ध्रुव प्रभाकर, इशान एस., समर्थ नागराज, माधव धारवाडकर, युवराज अरोरा, अगस्य राजू, शेखर शेट्टी, कार्तिक एस. यु, हर्षील धर्मानी आदी खेळाडूंचा समावेश आहे.
तमिळनाडू संघ- कर्णधार आंद्रे सिध्दार्थ, जयंत आर. के., एस. मोहमद अली, सचिन बी., केविन रोमारिओ के., अक्षय राजेंद्र शारंगधर, अभिनव के., श्रेनीक, आर. प्रविण, अॅलफ्रेड जोकोब, माधव प्रसाद, रोहन जे., पी. विग्नेश, साई कार्तिक, कार्तिक मनिकंदन, आय. एस. अंबरीश आदी खेळाडूंचा समावेश आहे.