महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हाथरसप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी

06:39 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राहुल गांधींचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हाथरस येथील दुर्घटनेच्या पीडित कुटुंबांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून मदतनिधी वाढविण्याची विनंती केली आहे. हाथरस येथील चेंगराचेंगरीमुळे प्रभावित पुटुंबांची भेट घेत त्यांच्या दु:खाची जाणीव करून घेतली. त्यांच्या समस्या उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्राच्या माध्यमातून कळविल्या आहेत. मुख्यमंत्री योगी यांनी भरपाईची रक्कम वाढवून शोकाकुल कुटुंबांना लवकरात लवकर प्रदान करावी असे राहुल गांधी यांनी रविवारी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.

या दु:खाच्या क्षणी हाथरस येथील पीडित कुटुंबांना आमच्या सामूहिक संवेदना आणि सहाय्याची आवश्यकता आहे. हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 120 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याने मी स्तब्ध आहे. मनात याचे दु:ख बाळगून मी हे पत्र तुम्हाला लिहित आहे. तुम्हालाही या दु:खाची जाणीव होत असेल हे जाणतो. अलीगढ आणि हाथरसच्या अनेक पीडित कुटुंबांची मी भेट  घेतली आणि त्यांचे दु:ख वाटून घेण्याचा प्रयत्न केला. दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याने पीडित कुटुंबीयांची भेट घेताना त्यांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे पडले. अनेक परिवारांनी या दुर्घटनेत सर्वस्व गमाविले आहे. तरीही प्रभावित कुटुंबांना शक्य तितकी मदत करून आम्ही त्यांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो असे राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

भरपाई रक्कम वाढविली जावी

उत्तरप्रदेश सरकारने जाहीर केलेली भरपाई अपुरी आहे. भरपाईची रक्कम वाढविली जावी आणि ती लवकरात लवकर दिली जावी अशी माझी विनंती आहे. तसेच जखमींवर योग्य ते उपचार करण्यात यावेत आणि त्यांनाही योग्य भरपाई देण्यात यावी असे राहुल गांधी यांनी स्वत:च्या पत्रात नमूद पेले आहे. दुर्घटनेसाठी स्थानिक प्रशासनाचा बेजबाबदारपणा आणि संवेदनाहीनता कारणीभूत असल्याचे पीडित कुटुंबीयांचे सांगणे आहे. याप्रकरणी योग्य आणि पारदर्शक तपास केल्यास आगामी काळात अशाप्रकारच्या दुर्घटना रोखणे शक्य होणार आहे.  तसेच पीडित कुटुंबीयांच्या मनात न्याय-व्यवस्थेबद्दल पुन्हा विश्वास निर्माण होणार आहे. न्यायाच्या दृष्टीकोनातून देखील दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे राहुल यांनी पत्रात म्हटले आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article