कारला दुचाकी घासल्याने वादावादी : तरुणावर चाकू हल्ला
01:06 PM Jun 03, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
उपलब्ध माहितीनुसार हिंडाल्को कारखान्यात काम करणारा मंजुनाथ केंप हा तरुण कणबर्गी-इंडाल रोडवरील कुंभार तलावाजवळ आपल्या कारमधून जात होता. कणबर्गी येथून तिखट कांडून घेऊन तो घरी जात होता. त्यावेळी कारला आरोपी नागराजची मोटारसायकल घासून गेल्याने रात्री वादावादी झाली होती. या घटनेचे पडसाद सोमवारी सकाळी उमटले. कारखान्यातील आपली कामे आटोपून मंजुनाथ मोटरसायकलवरून घरी जात होता. नागराज शिगीहळ्ळीने त्याला अडवून अर्वाच्च शिवीगाळ करीत चाकूने त्याच्यावर वार केला. मंजुनाथच्या छातीवर, डाव्या हाताच्या कोपरावर असे एकूण सात ठिकाणी वार करण्यात आले आहेत. केवळ सुदैवाने हा तरुण बचावला असून त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, चाकू हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नागराज शिगीहळ्ळीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर जखमी मंजुनाथच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या घरावर व कारवर दगडफेक केली असून कार व खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Advertisement
रात्रीच्या घटनेचा सोमवारी सकाळी वचपा : आरोपीच्या घर आणि कारवर हल्ला : कणबर्गी गावातील घटना
Advertisement
बेळगाव : रविवारी रात्री कारला मोटारसायकल घासून गेल्याचे निमित्त होऊन सोमवारी सकाळी त्याचे पडसाद उमटले. बसवनकोळ येथील एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला असून जखमी तरुणाच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या घरावर व कारवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. मंजुनाथ निंगाप्पा केंप (वय 23), राहणार बसवनकोळ असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. सोमवार दि. 2 जून रोजी सकाळी ऑटोनगर रोडवर ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी नागराज बसवराज शिगीहळ्ळी (वय 23) राहणार कणबर्गी याला अटक केली आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
Advertisement
Advertisement
Next Article