For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौदीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरून वाद

06:02 AM Nov 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
सौदीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरून वाद
Advertisement

ब्रिटनच्या प्रसारमाध्यमाकडून आरोप : सौदीने प्रकल्पाच्या सीईओला हटविले

Advertisement

वृत्तसंस्था/ जेद्दा

सौदी अरेबिया सरकारने एनईओएम प्रकल्पाचे सीईओ नदमी अल नस्र यांना पदावरून हटविले आहे. नदमी यांच्या जागी आता ऐमान अल-मुदाइफर यांना कार्यकारी सीईओ म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एनईओएम हा निर्जन वाळवंटत एक नवे शहर वसविण्याचा प्रकल्प आहे. तर दुसरीकडे ब्रिटनच्या प्रसारमाध्यमाने या प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान 21 हजार मजुरांचा मृत्यू झाल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

एनईओएम प्रकल्पाच्या यशावरून संशय वाढू लागला आहे. सरकार हा प्रकल्प मुदतीत पूर्ण न झाल्याने आणि वाढत्या खर्चामुळे निराश असल्याचे समजते. एनईओएम हा सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाकरता सौदीने 40 लाख कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केली आहे. हा प्रकल्प सौदी व्हिजन 2030 चा हिस्सा आहे. याच्या माध्यमातून सौदी अरेबिया कच्च्या तेलावरील स्वत:ची निर्भरता कमी करू इच्छित आहे.

एनईओएम प्रकल्पातील द लाइन हे शहर वसविण्यादरम्यान मागील 8 वर्षांमध्ये आतापर्यंत 21 हजार मजुरांचा मृत्यू झाला आहे. या मजुरांमध्ये बहुतांश करून भारत, पाकिस्तान आणि नेपाळचे लोक सामील होते असा दावा ब्रिटिश वृत्तवाहिनी आयटीव्हीने केला आहे.

सौदीने फेटाळला आरोप

या प्रकल्पावर काम करण्यादरम्यान दरदिनी 8 मजुरांचा मृत्यू होत असल्याचा दावा आहे. मृत्युमुखी पडलेल मजुरांमध्ये भारताचे 14 हजार नागरिक, बांगलादेशचे 5 हजार नागरिक आणि नेपाळचे 2 हजार नागरिक समील आहेत. तर एक लाखाहून अधिक लोक या प्रकल्पावर काम करताना बेपत्ता झाल्याचा आरोप आयटीव्हीने केला आहे. तर स्थलांतरित कामगारांना 16 तासांपर्यंत काम करण्यास भाग पाडले जात आहे. या कामगारांना अत्यंत खराब स्थितीत ठेवले जात असल्याने ते आजारी पडत आहेत, यातून त्यांचा मृत्यू ओढवत असल्याचे आयटीव्हीने म्हटले आहे. तर सौदी अरेबियाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. कामगार मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे सौदी अरेबियाने नमूद पेले आहे.

Advertisement
Tags :

.