For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य

06:11 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य
Advertisement

खासदार अनिल बोंडे यांच्या वक्तव्यावरुन वाद  : काँग्रेस नेत्यांचा भाजपावर हल्लाबोल

Advertisement

प्रतिनिधी, मुंबई :

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविऊद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर भाजपाचे राज्यसभा सदस्य अनिल बोंडे यांनीही राहुल गांधींविरोधात बोलताना अतिशय खालच्या पातळीवर  टीका केली आहे. यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

अमेरिका दौऱ्यावर असताना लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जॉर्जटाउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना भारतामधील आरक्षणा संदर्भात बोलले होते. यावर राहुल गांधींच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल यांच्या विरोधात बोलताना खालच्या पातळीवर जात टीका केली. व धमकीची चेथावणीखोर भाषा वापरली आहे. यामुळे  याप्रकरणी संजय गायकवाड यांच्याविरोधात काँग्रेसने आरोप केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे समर्थन नाही : बावनकुळे

दरम्यान, अनिल बोंडे यांनी राहुल गांधींविरोधात केलेल्या वक्तव्याला भाजपचे समर्थन नाही, असे महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी  म्हटले आहे. तसेच त्यांनी काँग्रेस नेत्यांनी भारतविरोधी वक्तव्ये करणे टाळण्याचा आणि आरक्षणाबाबत काँग्रेसला भूमिका स्पष्ट करण्याचा सल्ला दिला.

खा.अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धमकी दिल्याबद्दल भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.

दरम्यान काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर, खा. बळवंत वानखेडे, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिऊद्ध ऊर्फ बबलू देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केल्यानंतर  अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: नाना पटोले

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरीक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधांना पत्र लिहिले आहे पण अद्याप या धमकीबाजांवर कारवाई करण्यात आली नाही. एकनाथ शिंदेचा आमदार संजय गायकवाड यांनीही राहुल गांधीच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आहे. अशी घटना म्हणजे गंभीर बाब असून सरकारने यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज गुऊवारी काँग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

बोंडेंना तत्काळ अटक करा: यशोमती ठाकूर

भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. बोंडे यांचे विधान समाजामध्ये राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेष निर्माण करून त्यांच्यावर लोकमानसातून हल्ला व्हावा याकरिता उद्युक्त करणारे आहे. अनिल बोंडेंच्या वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अनिल बोंडे यांच्याविऊद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.

Advertisement
Tags :

.